Simple Preposition “with”

with (विथ) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये with  चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

with = सह, बरोबर (सोबत)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He is with his brother.
  • तो त्याच्या भावाबरोबर (भावासोबत) आहे.
Example 2
  • She works with him.
  • ती त्याच्यासह (त्याच्यासोबत) काम करते.

with = ..च्या जवळ, कडे, ..च्या हातात

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Please leave the keys with my neighbour.
  • कृपया चाव्या माझ्या शेजाऱ्याकडे (शेजाऱ्याजवळ) ठेवा.
Example 2
  • The decision does not rest with me.
  • तो निर्णय माझ्या हातात नाही आहे.

with = संगतीने, बरोबर, सोबत (मागे न पडता)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • We should change with the times.
  • आपण वेळेबरोबर (वेळेच्या मागे न पडता) बदलले पाहिजे.
Example 2
  • The prices of vegetables change with the season.
  • भाज्यांचे भाव हंगामासोबत बदलतात.

with = ..ने ("सहाय्या"ने या अर्थी)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • She cut all the vegetables with a knife.
  • तिने सर्व भाज्या सुरीने (सुरीच्या सहाय्याने) कापल्या.
Example 2
  • He was writing a letter with a pen.
  • तो लेखणीने (लेखणीच्या सहाय्याने) एक पत्र लिहित होता.

This article has been first posted on and last updated on by