Introduction to Pronoun


सर्वनाम


इंग्रजी व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये किंवा वाक्यसमूहामध्ये एखाद्या Noun चा वारंवार उच्चार करावा लागतो. असा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी Noun ऐवजी Pronoun (प्रोनाऊन) चा उपयोग करण्यात येतो.

नियम १

Simple Sentence मध्ये वाक्यात पहिल्या स्थानी किंवा तिसऱ्या स्थानी Pronoun वापरले जाते.

नियम २

Pronouns चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या Cases (Nominative Case, Accusative Case, Possessive Case) मध्ये केलेले आहे.

तसेच, या Pronouns चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या Persons (First Person, Second Person, Third Person) मध्ये सुद्धा केलेले आहे.

नियम ३

Nominative Case

वाक्यात पहिल्या स्थानी वापरलेले pronoun हे नेहमी Nominative Case चे समजले जाते.

Nominative Case चे pronoun हे वाक्यात फक्त पहिल्या स्थानी Subject (कर्ता) म्हणून वापरतात. हे pronoun कधीही तिसऱ्या स्थानी Object (कर्म) म्हणून वापरू नये.

Nominative Case ची Pronouns
Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I - मी We - आम्ही
Second Person (द्वितीय पुरुष) You - तू You - तुम्ही
Third Person (तृतीय पुरुष)

He - तो


She - ती


It - तो / ती / ते

They - ते / त्या / ती
नियम ४

Accusative Case

वाक्यात तिसऱ्या स्थानी वापरलेले pronoun हे नेहमी Accusative Case चे समजले जाते.

Accusative Case चे pronoun हे वाक्यात फक्त तिसऱ्या स्थानी Object (कर्म) म्हणून वापरतात. हे pronoun कधीही पहिल्या स्थानी Subject (कर्ता) म्हणून वापरू नये.

Accusative Case ची Pronouns
Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) me - मला us - आम्हाला
Second Person (द्वितीय पुरुष) you - तुला you - तुम्हाला
Third Person (तृतीय पुरुष)

him - त्याला


her - तिला


it - त्याला / तिला

them - त्यांना
नियम ५

Possessive Case

Possessive Case चे pronoun वाक्यात Subject (कर्ता) म्हणून पहिल्या स्थानी किंवा Object (कर्म) म्हणून तिसऱ्या स्थानी स्वतंत्र न वापरता Noun च्या अगोदर त्याला जोडून वापरतात. त्यामुळे, हे Noun ज्या स्थानी असते, त्या स्थानात या pronoun ला राहावे लागते.

जोपर्यंत हे pronoun स्वतंत्र असते, तोपर्यंत त्याला Possessive Case चे pronoun समजावे. परंतु, जेव्हा ते Noun ला जोडून वापरले जाते, तेव्हा त्याला Possessive Adjective असे म्हणतात.

Possessive Case ची Pronouns
Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) my
माझा / माझी / माझे / माझ्या
our
आमचा / आमची / आमचे / आमच्या
Second Person (द्वितीय पुरुष) your
तुझा / तुझी / तुझे / तुझ्या
your
तुमचा / तुमची / तुमचे / तुमच्या
Third Person (तृतीय पुरुष)

his
त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या


her
तिचा / तिची / तिचे / तिच्या


it
त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या / तिचा / तिची / तिचे / तिच्या

them
त्यांचा / त्यांची / त्यांचे / त्यांच्या

List of Pronouns

Person Nominative Accusative Possessive
Singular Plural Singular Plural Singular Plural
First
(प्रथम)
I We me us my our
Second
(द्वितीय)
You you you you your your
Third
(तृतीय)

He

She

It

They

him

her

it

them

his

her

its

their

This article has been posted on and last updated on by