Gerund – विषय सूची
Gerund म्हणजे काय?

Gerund (जीरंड) म्हणजे धातुसाधित नाम किंवा कृदंत होय.

ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला To चे Verb असे म्हणतात.

अशा क्रियादर्शक शब्दाच्या शेवटी ing प्रत्यय लावून Gerund तयार होते.

Gerund आणि Present Participle मधील फरक

कोणत्याही To च्या Verb ला शेवटी ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो त्याला एकतर Gerund किंवा Present Participle यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

Verb + ing या शब्दाचा संबंध जेव्हा एखाद्या Noun शी जोडलेला असतो, तेव्हा त्या शब्दाला Present Participle असे म्हणतात.

मात्रा, जेव्हा Verb + ing हा शब्द वाक्यातील Transitive Main Verb (ट्रान्झीटिव्ह मेन व्हर्ब) ला जोडून वापरलेला असतो, तेव्हा त्याला Gerund असे म्हणतात.

Noun Phrase मधील Gerund

Gerund पासून सुरू होणाऱ्या शब्दसमूहाला Noun Phrase असे म्हणतात.

सामान्यतः Gerund हे वाक्यातील To च्या Verb नंतर त्याला जोडून वापरतात किंवा Gerund ने वाक्याची सुरूवात केली जाते.

Gerund जेव्हा वाक्याच्या सुरूवातीला येते, तेव्हा ते Subject म्हणून कार्य करते आणि जेव्हा ते वाक्याच्या तिसऱ्या स्थानी येते, तेव्हा ते Object म्हणून कार्य करते.

Noun Phrase as Subject

Gerund ने सुरू झालेली Noun Phrase जर वाक्याच्या सुरूवातीला वापरलेली असेल, तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्याचा Subject समजावे.

For example (उदाहरणार्थ),
  • सकाळी लवकर उठणे हे प्रकृतीसाठी फार चांगले असते.
  • Waking up early in the morning is very good for health.

वरील वाक्यामध्ये waking up early in the morning ही Noun Phrase वाक्याच्या सुरूवातीला वाक्याचा Subject म्हणून वापरण्यात आली आहे.

Noun Phrase as Object

Gerund ने सुरू झालेली Noun Phrase जर वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेली असेल, तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्यातील Object समजावे.

For example (उदाहरणार्थ),
  • सकाळी लवकर उठण्याचे मी काल ठरवले होते.
  • Yesterday I had decided waking up early in the morning

वरील वाक्यामध्ये waking up early in the morning ही Noun Phrase वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object म्हणून वापरण्यात आली आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • सुंदर अक्षरात पत्र लिहिणे ही एक कला आहे.
  • Writing a letter in good handwriting is an art.
Example 2
  • माझ्या आईला पंढरपूरला जाण्याची इच्छा होती.
  • My mother wished going to Pandharpur.
Example 3
  • धुम्रपान करणे हे प्रकृतीसाठी घातक आहे.
  • Smoking is harmful for health.
Example 4
  • प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आशा असते.
  • Every student wishes passing in the examination.
Example 5
  • रोज पोहणे एक चांगला व्यायाम आहे.
  • Swimming everyday is a good exercise.

This article has been first posted on and last updated on by