Subject having Infinitive


वाक्याच्या कर्त्यामध्ये मूळरूपाचा उपयोगनियम १

कधीकधी इंग्रजी वाक्याची सुरूवात Infinitive (क्रियापदाचे मूळरूप) ने केलेली असते आणि त्याचा उपयोग त्या वाक्याच्या Subject ची रचना करण्यासाठी केलेला असतो.

नियम २

Infinitive हे To चे Verb असल्यामुळे ते एकतर Transitive (सकर्मक) किंवा Intransitive (अकर्मक) असते.

नियम ३

Infinitive जर Transitive (सकर्मक) असेल तर त्याला स्वतःचे Object असू शकते.

नियम ४

तसेच, Infinitive ने सूचित होणाऱ्या क्रियेसंबंधी अधिक माहिती देणारे Extension / Adverb Phrase सुद्धा त्याला जोडून वापरलेले असू शकते.

नियम ५

Infinitive ने सुरू झालेल्या या तीन घटकांच्या शब्दसमूहानंतर Main Verb म्हणून Intransitive (अकर्मक) असलेले is / was यांपैकी To be चे Verb वापरलेले असते.

नियम ६

त्याचप्रमाणे, Main Verb म्हणून Intransitive (अकर्मक) असलेले become / seem / appear / make यांपैकी To चे Verb सुद्धा वापरता येते.

नियम ७

हे Main Verb नेहमी Intransitive (अकर्मक) असल्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याच्यानंतर एखादे Complement (पूरक) वापरलेले असते.

नियम ८

या रचनेत Main Verb च्या अगोदर वापरलेला Infinitive + Object + Extension हा संपूर्ण शब्दसमूह वाक्याचा Subject म्हणून वापरलेला असतो.

Subject म्हणून वापरलेल्या या शब्दसमूहाला Noun Phrase असे म्हणतात.

नियम ९

या रचनेच्या Negative Sense च्या म्हणजे नकारार्थी अर्थामध्ये वाक्याची सुरूवात Not ने करावी आणि त्याला जोडून वाक्याचा Noun Phrase च्या स्वरूपातील Subject लिहावा.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
 • खरे बोलणे एक सद्गुण आहे.
 • To speak the truth is a good virtue.
Ex. 2
 • खोटे बोलणे एक दुर्गुण आहे.
 • To tell a lie is a bad virtue.
Ex. 3
 • सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे.
 • To wake up early in the morning is a good habit.
Ex. 4
 • संपत्ती उधळणे ही एक अविचारी कृती आहे.
 • To squander wealth is a thoughtless action.
Ex. 5
 • वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे कठीण दिसते.
 • To pass the final exam seems difficult.
Ex. 6
 • पाहुण्यांचे हसून स्वागत करणे एक चांगला शिष्टाचार आहे.
 • To welcome guests with a smile is a good manner.
Ex. 7
 • मुलभूत संकल्पना न समजल्यामुळे काही विद्यार्थ्यांना गणित कठीण जाते.
 • Not to understand basic concepts makes Mathematics tough for some students.

This article has been first posted on and last updated on by