Modal Auxiliary Verb “can”

can (कॅन) हे एक Modal Auxiliary Verb आहे.

जेव्हा आपण एखादी गोष्ट physically (फिजिकली) म्हणजे शारीरिकदृष्ट्या  किंवा mentally (मेन्टली) म्हणजे बौद्धिकदृष्ट्या करण्यास समर्थ असतो, तेव्हा आपली शारीरिक किंवा बौद्धिक क्षमता व्यक्त करण्यासाठी can चा उपयोग केला जातो.

नियम १

वाक्यातील To च्या Verb चा जो मूळ अर्थ असतो, तो अधिक परिणामकारक करण्यासाठी किंवा त्यामधून दुसरा अर्थ निर्माण करण्यासाठी can चा उपयोग केला जातो.

नियम २

वाक्यात उपयोग करताना वाक्याच्या Subject नंतर can चा क्रम लावावा आणि ते ज्या To च्या Verb ला सहाय्य करते, ते नेहमी पहिल्या रूपाचे लिहावे.

नियम ३
able to चा वाक्यातील उपयोग

able to हे Modal Auxiliary Verb नसून ती एक क्षमता दाखवणारी रचना आहे.

जेव्हा आपल्याला शारीरिक किंवा बौद्धिक क्षमतेची शंका असते, तरीसुद्धा कदाचित आपल्याला नकळत अशी क्षमता आपल्यामध्ये असेल असे वाटते, तेव्हा able to च्या रचनेचा उपयोग केला जातो.

able to चा उपयोग करताना त्याच्या अगोदर योग्य ते To be चे Verb वापरावे लागते. त्यासाठी वाक्याचा Subject आणि Tense लक्षात घ्यावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • एका माणसाला तो दगड बाजूला करता येईल.
  • One person can move the stone aside.
Example 2
  • विक्रमला पूर आलेली नदी ओलांडता येते.
  • Vikram can cross the flooded river.
Example 3
  • संदीपला वाटते की त्याला नदी ओलांडता येईल.
  • Sandeep thinks that he will be able to cross the river.
Example 4
  • हितेश कोणतेही गणित सहज सोडवू शकतो.
  • Hitesh can solve any mathematical problem easily.
Example 5
  • त्याच्या मित्रांना वाटते की ते अनवाणी चालू शकतात.
  • His friends feel that they are able to walk barefoot.

This article has been first posted on and last updated on by