“must” showing Duty

Duty (ड्युटी) म्हणजे कर्तव्य हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • न्यायाधीशाने प्रामाणिक असलेच पाहिजे.
  • A judge must be upright.

प्रामाणिक असणे हे न्यायाधीशाचे कर्तव्य आहे, प्रामाणिक असल्याशिवाय योग्य तो न्याय होऊ शकत नाही.

कर्तव्य हा भाव दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.

Example 2
  • शिक्षकाने आपल्या व्यवसायात आदर्श असलेच पाहिजे.
  • A teacher must be ideal in his profession.

आदर्श असणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे, आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवू शकतो.

कर्तव्य हा भाव दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.

Example 3
  • डॉक्टरने आपल्या व्यवसायातील पावित्र्य ओळखायलाच पाहिजे.
  • A doctor must realize the sanctity of his profession.

आपल्या व्यवसायातील पावित्र्य ओळखून काम करणे हे डॉक्टरचे कर्तव्यच आहे.

कर्तव्य हा भाव दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.

This article has been first posted on and last updated on by