ought


ought चा वाक्यातील उपयोग



Modal Auxiliary Verb “ought”

Duty (ड्युटी) म्हणजे नैतिक कर्तव्य आणि Obligation (ऑब्लिगेशन) म्हणजे कायद्याने किंवा धर्माने घालून दिलेले नैतिक बंधन यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी ought चा उपयोग केला जातो.

ought चा उपयोग must सारखाच अर्थ व्यक्त करण्यासाठी केला जातो. मात्र, ought चा संबंध नैतिकतेशी जोडलेला असतो.

“ought to” ची रचना

ought ला जोडून नेहमी एखादे Infinitive वापरावे लागते. त्यामुळे, या रचनेला ought to ची रचना असेही म्हणतात.

ought to चे नकारार्थी स्वरूप  ought not to असे करावे लागते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळायला हवी.
  • आईवडिलांची आज्ञा पाळणे हे मुलांचे नैतिक कर्तव्य आहे.
  • Children ought to obey their parents.
Example 2
  • आपण रोज देवाजवळ प्रार्थना करायला हवी.
  • देवाजवळ रोज प्रार्थना करणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे.
  • We ought to pray to God every day.
Example 3
  • आपण आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा.
  • आपल्या आईवडिलांचा आदर करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.
  • We ought to respect our parents.
Example 4
  • आपण एखाद्या आंधळ्या व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करायला हवी.
  • एखाद्या आंधळ्या व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणे आपले नैतिक कर्तव्य आहे.
  • We ought to help a blind man cross the road.
Example 5
  • गाडी चालवताना तुम्ही रहदारीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
  • गाडी चालवताना तुम्ही रहदारीच्या नियमांचे पालन करून कायद्याचे बंधन पाळायला हवे.
  • You ought to obey the traffic rules while driving your car.

This article has been first posted on and last updated on by