should


should चा वाक्यातील उपयोग


should या Modal Auxiliary Verb ने Duty (कर्तव्य) / Obligation (नैतिक बंधन) हे भाव व्यक्त होतात.

जेव्हा एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून करावीशी वाटते किंवा दुसरे कुणीतरी ती नैतिक बंधन म्हणून करायला सांगते, तेव्हा should ची रचना वापरली जाते.

Ex. 1
 • You should always speak the truth.

 • तू नेहमी खरे बोलावेस.

Ex. 2
 • Student should study hard.

 • विद्यार्थ्याने खूप अभ्यास करावा.

Ex. 3
 • You should not waste your time in laziness.

 • तुम्ही तुमचा वेळ आळसात घालवू नये.

Ex. 4
 • All the boys and girls should exercise everyday for good health.

 • सर्व मुलांनी आणि मुलींनी चांगल्या प्रकृतीकरिता रोज व्यायाम करावा.

Ex. 5
 • We should not disobey our parents.

 • आपण आपल्या आईवडिलांची अवज्ञा करू नये.

Ex. 6
 • You should keep you house clean.

 • तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवावे.

This article has been posted on and last updated on by