could have


"could have" चा वाक्यातील उपयोगनियम १

एखादी गोष्ट आपण वेळेवर न केल्यामुळे ती गोष्ट राहून जाते. मात्र, अशी राहून गेलेली गोष्ट करण्याची आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता असते असे आपल्या लक्षात येते.

नियम २

वेळ निघून गेल्यानंतर ही गोष्ट आपण करू शकलो असतो, ती करण्याची आपली बौध्दिक आणि शारीरिक क्षमता होती, असे जेव्हा सुचवायचे असते, तेव्हा could have + Past Participle ही रचना वापरतात.

Examples (उदाहरणार्थ)
  • मी माझ्या आयुष्यात पंतप्रधान होऊ शकलो असतो; पण मला पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती.
  • In my life I could have become a prime minister but I had no desire to become one.
  • मी १० वर्षांपूर्वी मुंबईमध्ये घर घेऊ शकलो असतो; पण मला पुण्याला राहायचे होते.
  • I could have bought a house in Mumbai 10 years ago, but I wanted to stay in Pune.
  • तो भारतीय सैन्यात भरती होऊ शकला असता.
  • He could have joined the Indian Army.

This article has been first posted on and last updated on by