should have


"should have" चा वाक्यातील उपयोग


नियम १

कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट कर्तव्य (duty) किंवा नैतिक बंधन (obligation) म्हणून करावयाची असते आणि ती तशी करण्याचे आपल्याकडून राहून जाते; पण नंतर आपण ती गोष्ट करावयास हवी होती असे कदाचित आपल्याला पश्चात्ताप म्हणून वाटते.

नियम २

जेव्हा अशी भावना आपल्याला व्यक्त करायची असते, तेव्हा should have + Past Participle ही रचना वापरली जाते.

Examples (उदाहरणार्थ)
  • मी माझ्या वडिलांचा अपमान करावयास नको होता.
  • I should not have insulted my father.
  • आपण आपल्या गरीब मित्राला मदत करावयास हवी होती.
  • We should have helped our poor friend.
  • त्याने आपल्या आईला खोटे सांगावयास नको होते.
  • He should not have told a lie to his mother.
  • लोकांच्या पुढाऱ्याने साधे जीवन जगायला हवे होते.
  • The leader of people should have lived a simple life.
  • आपण मुक्या प्राण्यांना पीडा द्यायला नको होती.
  • We should not have afflicted mute animals.

This article has been posted on and last updated on by