Past Participle


भूतकालवाचक धातुसाधित


नियम १

To च्या Verb च्या तिसऱ्या रूपाला Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) असे म्हणतात.

नियम २

Past Participle सामान्यतः Perfect Series च्या वाक्यात Main Verb ला जोडून वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरले जाते किंवा एखाद्या Noun ला जोडून वापरले जाते.

नियम ३

जेव्हा Past Participle चा संबंध वाक्यातील एखाद्या Noun शी येतो, तेव्हा त्या रचनेला Passive Voice म्हणजे कर्मणी प्रयोगाचे स्वरूप असते.

अशा वाक्यात Past Participle एखाद्या Adjective (विशेषण) प्रमाणे संबंधित Noun बद्दल अधिक माहिती देण्याचे काम करते.

नियम ४

Past Participle ज्या Noun ला जोडून वापरलेले असते, ते Noun वाक्यात एकतर पहिल्या स्थानी Subject (कर्ता) म्हणून किंवा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object (कर्म) म्हणून वापरलेले असते.

नियम ५

Past Participle ज्या Noun ला जोडून वापरलेले असते, त्याच Noun वर त्या Past Participle ची क्रिया घडत असते.

याचाच अर्थ असा कि संबंधित Noun हे त्या जोडून वापरलेल्या Past Participle चे Object (कर्म) समजले जाते.

नियम ६

Past Participle ने दर्शविलेली क्रिया जो कोणी करतो, तो कर्ता स्पष्ट करण्यासाठी by हे Preposition वापरावे लागते आणि by ला जोडून क्रिया करणारा Subject (कर्ता) हा नेहमी Accusative Case च्या स्वरूपात लिहावा लागतो.

Examples (उदाहरणार्थ)
  • १५०० सालांत एका राजाने बांधलेला एक प्राचीन किल्ला आम्ही गेल्यावर्षी पाहिला.
  • Last year we saw an ancient fort built by a king in the year 1500.
  • कावळ्याने बांधलेल्या घरट्यातून एक अंडे जमिनीवर पडले.
  • An egg fell to the ground from the nest built by a crow.
  • कोपऱ्यातील टेबलावर ठेवलेला दूरदर्शन संच घरातील सर्व माणसांची करमणूक करतो.
  • The television set placed on the table in the corner entertains all the persons in the family.
  • गावातील एका दानशूर माणसाने बांधलेल्या धर्मशाळेत प्रवासी आश्रय घेतात.
  • Travellers seek shelter in the inn built by a philanthropist in the village.
  • नदीपलीकडे बांधलेल्या नवीन इमारतीत बरेच लोक राहतात.
  • Several people live in the new building built across the river.

मराठी वाक्यातील Past Participle कसे ओळखावे?

नियम १

वरील उदाहरणांतील मराठी वाक्ये बघितली असता असे लक्षात येईल कि या प्रत्येक मराठी वाक्यात कमीत कमी दोन क्रियादर्शक to ची Verbs वापरलेली आहेत.

नियम २

या दोन to च्या Verbs पैकी अगदी शेवटी वापरलेले to चे Verb हे वाक्यातील Main Verb असते.

इंग्रजी भाषांतर करताना हे Main Verb इंग्रजी वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.

नियम ३

उरलेली to ची Verbs वाक्यात कुठेतरी मध्ये एखाद्या Noun ला जोडून वापरलेली असतात आणि त्यांना ला / ली / ले / ल्या यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेला असतो.

नियम ४

मराठी वाक्यातील ज्या to च्या Verb सोबत ला / ली / ले / ल्या यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्याला त्या वाक्यातील Past Participle समजावे.

This article has been posted on and last updated on by