Present Participle


वर्तमानकालवाचक धातुसाधित


नियम १

To च्या Verb ला शेवटी ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो त्याला एकतर Present Participle (वर्तमानकालवाचक धातुसाधित) किंवा Gerund (धातुसाधित नाम) यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

नियम २

जेव्हा To चे Verb + ing हा शब्द Continuous Series आणि Perfect Continuous Series च्या वाक्यांत वापरली जाते, तेव्हा त्याला Present Participle (वर्तमानकालवाचक धातुसाधित) असे म्हणतात.

नियम ३

तसेच, जेव्हा या शब्दाचा संबंध एखाद्या Noun शी जोडलेला असतो, तेव्हा त्या शब्दाला Present Participle (वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण) असे म्हणतात.

नियम ४

सामान्यतः वाक्यामध्ये एखादे Adjective (विशेषण) एखाद्या Noun ला जोडून त्याच्या अगोदर वापरले जाते आणि ते Adjective (विशेषण) त्या संबंधित Noun विषयी अधिक माहिती देते, हे आपल्याला माहित आहे.

त्याचप्रमाणे, Present Participle सुद्धा एखाद्या Noun ला जोडूनच वापरले जाते. परंतु, हे Adjective (विशेषण) कृत्रिम असल्यामुळे ते संबंधित Noun च्या अगोदर न वापरता त्याला जोडून त्याच्यानंतर वापरले जाते.

नियम ५

Present Participle हे प्रत्यक्षात To चे Verb असल्यामुळे ते Transitive (सकर्मक) असू शकते.

Transitive (सकर्मक) असल्यास त्याला स्वतःचे Object आणि Extension असू शकते.

नियम ६

Present Participle + Object + Extension या शब्दसमूहाला Adjective Phrase असे म्हणतात.

नियम ७

Adjective Phrase with Subject

Present Participle ने सुरू झालेली Adjective Phrase ज्या Noun ला जोडलेली असते, ते Noun जर वाक्याचा Subject (कर्ता) म्हणून वापरलेले असेल, तर Noun + Adjective Phrase या संपूर्ण शब्दसमूहाला त्या वाक्याचा Subject (कर्ता) म्हणून गृहीत धरावे.

For example (उदाहरणार्थ):
 • The boys playing cricket on the road hinder the traffic.
 • रस्त्यात क्रिकेट खेळणारी मुले रहदारीला अडथळा करतात.

वरील वाक्यामध्ये The boys हे Noun आणि playing cricket on the road ही Adjective Phrase असा संपूर्ण शब्दसमूह वाक्याचा Subject (कर्ता) म्हणून गृहीत धरावा.

नियम ८

Adjective Phrase with Object

त्याचप्रमाणे, Present Participle ने सुरू झालेली Adjective Phrase ज्या Noun ला जोडलेली असते, ते Noun जर वाक्याचा Object (कर्म) म्हणून वापरलेले असेल, तर Noun + Adjective Phrase या संपूर्ण शब्दसमूहाला त्या वाक्याचे Object (कर्म) म्हणून गृहीत धरावे.

For example (उदाहरणार्थ):
 • The class-teacher punished the two students making noise in the classroom.
 • वर्गात गोंगाट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी शिक्षा केली.

वरील वाक्यामध्ये the two students हे Noun आणि making noise in the classroom ही Adjective Phrase असा संपूर्ण शब्दसमूह वाक्याचे Object (कर्म) म्हणून गृहीत धरावे.

Examples (उदाहरणार्थ)
 • मी आमच्या इमारतीच्या गच्चीवर एक पतंग उडवणारा मुलगा पाहिला.
 • I saw a boy flying a kite on the terrace of our building.
 • नदीत बुडणाऱ्या एका मुलाला वाचवणाऱ्या एका अनोळखी माणसाची लोकांनी प्रशंसा केली.
 • People admired a stranger saving a boy sinking in the river.
 • आकाशात उंच उडणारी गिधाडे जमिनीवरील एखादे मेलेले जनावर शोधत होती.
 • The vultures flying high in the sky were searching for a carcass of an animal on the ground.
 • पिंजऱ्यात फळे खाणारा पक्षी कायमचा बंदिवान असतो. मला आकाशात मुक्तपणे उडणारा पक्षी आवडतो.
 • The bird eating fruits in the cage is a prisoner permanently. I like a bird flying freely in the sky.
 • फुलझाडांवर उडणारी फुलपाखरे पकडण्याचा प्रयत्न करणारी मुले पाच ते दहा वयोगटातील होती.
 • The children trying to catch the butterflies flying over the flowering trees were between five and ten years of age.

मराठी वाक्यातील Present Participle कसे ओळखावे?

नियम १

वरील उदाहरणांतील मराठी वाक्ये बघितली असता असे लक्षात येईल कि या प्रत्येक मराठी वाक्यात कमीत कमी दोन क्रियादर्शक to ची Verbs वापरलेली आहेत.

नियम २

या दोन to च्या Verbs पैकी अगदी शेवटी वापरलेले to चे Verb हे वाक्यातील Main Verb असते.

इंग्रजी भाषांतर करताना हे Main Verb इंग्रजी वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.

नियम ३

उरलेली to ची Verbs वाक्यात कुठेतरी मध्ये एखाद्या Noun ला जोडून वापरलेली असतात आणि त्यांना रा / री / रे / ऱ्या यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेला असतो.

नियम ४

मराठी वाक्यातील ज्या to च्या Verb ला रा / री / रे / ऱ्या यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्याला त्या वाक्यातील Present Participle समजावे.

नियम ५

कधी कधी हे क्रियापद पोहत असलेले, रांगत असलेली अशा शब्दस्वरूपाचे असते. त्यामुळे अशा शब्दस्वरूपाच्या मराठी वाक्यातील to च्या Verb ला सुद्धा नेहमी Present Participle समजावे.

This article has been posted on and last updated on by