To use "do"


do चा वाक्यातील उपयोग


नियम १

do या क्रियापदाला त्याच्या वाक्यातील उपयोगानुसार To चे Verb किंवा Primary Auxiliary Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

नियम २

do हे क्रियापद जेव्हा वाक्यातील Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते, तेव्हा त्याला Primary Auxiliary Verb असे म्हणतात.

नियम ३

जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये have चा उपयोग Primary Auxiliary Verb म्हणून केलेला असतो, तेव्हा सामान्यतः ते वाक्य Simple Present Tense / Simple Past Tense यांपैकी एका Tense चे असते.

नियम ४

do चा उपयोग सामान्यतः Interrogative Sentence (प्रश्नार्थक वाक्य) किंवा Negative Sentence (नकारार्थी वाक्य) यांमध्ये करण्यात येतो.

यांमध्ये do या क्रियापदाच्या पुढील स्वरूपांचा समावेश होतो.

Type
(प्रकार)
Form of do
(do चे स्वरूप)
Where to use
(कुठे वापरावे)
Present Tense
(वर्तमानकाळ)
do,
does
Simple Present Tense
(साधा वर्तमानकाळ)

Interrogative Sentence
(प्रश्नार्थक वाक्य)

Negative Sentence
(नकारार्थी वाक्य)

Past Tense
(भूतकाळ)
did Simple Past Tense
(साधा भूतकाळ)
Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • When do you get up?

  • तुम्ही किती वाजता उठता?

वरील वाक्य Simple Present Tense चे Interrogative Sentence (प्रश्नार्थक वाक्य) आहे.

या वाक्यामध्ये do हे Present Tense (वर्तमानकाळ) चे क्रियापद वापरलेले आहे.

त्याचा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते get up (उठणे) या Main Verb ला वाक्याच्या अर्थातून प्रश्न विचारण्यासाठी सहाय्य करीत आहे.

Ex. 2
  • Where did she go?

  • ती कुठे गेली?

वरील वाक्य Simple Past Tense चे Interrogative Sentence (प्रश्नार्थक वाक्य) आहे.

या वाक्यामध्ये did हे Past Tense (भूतकाळ) चे क्रियापद वापरलेले आहे.

त्याचा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून ते go (जाणे) या Main Verb ला वाक्याच्या अर्थातून प्रश्न विचारण्यासाठी सहाय्य करीत आहे.

Ex. 3
  • They did not know him.

  • ते त्याला ओळखत नव्हते.

वरील वाक्य Simple Past Tense चे Negative Sentence (नकारार्थी वाक्य) आहे.

या वाक्यामध्ये did हे Past Tense (भूतकाळ) चे क्रियापद वापरलेले आहे.

त्याचा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून त्याच्यासोबत not वापरल्यामुळे ते Negative Sentence (नकारार्थी वाक्य) चे समजले जाते.

Ex. 4
  • I do not like coffee.

  • मला कॉफी आवडत नाही.

वरील वाक्य Simple Present Tense चे Negative Sentence (नकारार्थी वाक्य) आहे.

या वाक्यामध्ये do हे Present Tense (वर्तमानकाळ) चे क्रियापद वापरलेले आहे.

त्याचा उपयोग Auxiliary Verb म्हणून केलेला असून त्याच्यासोबत not वापरल्यामुळे ते Negative Sentence (नकारार्थी वाक्य) चे समजले जाते.

This article has been posted on and last updated on by