To use "shall / will"


shall / will चा वाक्यातील उपयोग


नियम १

shall आणि will ला त्याच्या वाक्यातील उपयोगानुसार To be चे Verb किंवा Primary Auxiliary Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

नियम २

shall / will हे क्रियापद जेव्हा वाक्यातील Main Verb ला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते, तेव्हा त्याला Primary Auxiliary Verb असे म्हणतात.

नियम ३

जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये shall / will चा उपयोग Primary Auxiliary Verb म्हणून केलेला असतो, तेव्हा सामान्यतः ते वाक्य Simple Future Tense / Future Continuous Tense / Future Perfect Tense यांपैकी एका Tense चे असते.

नियम ४

वाक्याच्या Subject चे Person (पुरूष) लक्षात घेऊन shall / will यांपैकी योग्य ते क्रियापद वापरावे लागते.

अशाप्रकारे shall / will चा वापर सामान्यतः वाक्यातील Future Tense (भविष्यकाळ) दर्शविण्यासाठी केला जातो.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I shall We shall
Second Person (द्वितीय पुरुष) You (तू) will You (तुम्ही) will
Third Person (तृतीय पुरुष)

He will


She will


It will


Singular Number Noun + will

They will


Plural Number Noun + will

नियम ५

कधीकधी वाक्यातील क्रियापद हे वाक्याच्या Subject चा मनोदय (will) / इच्छा (desire) / निश्चय (determination) दाखवते.

अशावेळी will या Primary Auxiliary Verb चा First Person (प्रथम पुरूष), Second Person (द्वितीय पुरूष) आणि Third Person (तृतीय पुरूष) अशा सर्व Persons मध्ये उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ):
  • He will find out what is wrong.
  • काय चुकतंय ते तो शोधून काढेल.

वरील वाक्यामध्ये वाक्याचा Subject (कर्ता) म्हणून वापरलेल्या He (तो) या Pronoun चा निश्चय व्यक्त करण्यासाठी will चा उपयोग केलेला आहे.

नियम ६

वस्तू किंवा प्राणी यांच्या स्वाभाविक गुणधर्मांमुळे त्यांच्याकडून ज्या क्रिया घडतात, त्या दर्शविण्यासाठी will चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ):
  • Cats and dogs will always fight.
  • कुत्रे आणि मांजरी नेहमी भांडणारच.

परस्परांशी भांडण करणे हा कुत्र्यांचा आणि मांजरींचा स्वाभाविक गुणधर्म आहे. वरील वाक्यामध्ये हा गुणधर्म दर्शविण्यासाठी will चा उपयोग केलेला आहे.

नियम ७

नियमावली आणि सूचनांच्या बाबतीत अनेकदा shall या क्रियापदाचा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ):
  • Members shall return the book to the library within fifteen days.
  • सदस्यांनी पंधरा दिवसांत ग्रंथालयाला पुस्तक परत करावे.

पंधरा दिवसांत पुस्तक परत करणे हा ग्रंथालयाचा नियम असल्याने तो दर्शविण्यासाठी shall चा उपयोग केला आहे.

नियम ८

कधीकधी वाक्यातील क्रियापद वाक्याच्या Subject चा मनोदय किंवा इच्छा दाखवत नाही, तर ते वाक्य बोलणाऱ्याचा वाक्याच्या Subject बद्दलचा मनोदय दर्शविते.

अशा वाक्यांत shall चा उपयोग Second Person (द्वितीय पुरूष) आणि Third Person (तृतीय पुरूष) मध्ये केला जातो

अशा वाक्यांत shall चा उपयोग First Person (प्रथम पुरूष) च्या I किंवा We सोबत कधीही करू नये.

For example (उदाहरणार्थ):
  • He shall suffer for what he has done.
  • त्याने जे केलेलं आहे त्याबद्दल त्याला दु:ख सोसावे लागेल.

वरील वाक्यात वाक्य बोलणारा वाक्याच्या Subject बद्दल त्याला काय करावे लागेल हे सांगत आहे आणि त्यासाठी shall चा उपयोग केला आहे.

This article has been posted on and last updated on by