To be चे Verb - Future Tense


भविष्यकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद


shall be आणि will be ही स्थितीदर्शक to be ची Verbs नेहमी Future Tense म्हणजे भविष्यकाळाची समजली जातात.

वाक्याचा Subject (कर्ता) हा Nominative Case च्या Pronoun किंवा Noun च्या स्वरूपात असतो.

Subject चे Person (पुरूष) लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.

Subject च्या Number (वचन) चा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I shall be We shall be
Second Person (द्वितीय पुरुष) You (तू) will be You (तुम्ही) will be
Third Person (तृतीय पुरुष)

He will be


She will be


It will be


Singular Number Noun + will be

They will be


Plural Number Noun + will be

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • I shall be late.

  • मला उशीर होईल.

Ex. 2
  • Ramesh will be with his mother tomorrow.

  • रमेश उद्या त्याच्या आईसोबत असेल.

Ex. 3
  • He will be in Australia tomorrow.

  • तो उद्या ऑस्ट्रेलियामध्ये असेल.

Ex. 4
  • Next year they will be in 10th standard.

  • पुढील वर्षी ते दहाव्या इयत्तेत असतील.

Ex. 5
  • Mother will be in the kitchen.

  • आई स्वयंपाकघरात असेल.

This article has been posted on and last updated on by