To be चे Verb - Past Tense


भूतकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद


was आणि were ही स्थितीदर्शक to be ची Verbs नेहमी Past Tense म्हणजे भूतकाळाची समजली जातात.

वाक्याचा Subject (कर्ता) हा Nominative Case च्या Pronoun किंवा Noun च्या स्वरूपात असतो.

Subject चे Person (पुरूष) आणि Number (वचन) लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I was We were
Second Person (द्वितीय पुरुष) You (तू) were You (तुम्ही) were
Third Person (तृतीय पुरुष)

He was


She was


It was


Singular Number Noun + was

They were


Plural Number Noun + were

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • Yesterday it was Saturday.

  • काल शनिवार होता.

Ex. 2
  • Last Monday she was in Mumbai.

  • मागच्या सोमवारी ती मुंबईमध्ये होती.

Ex. 3
  • He was an old man.

  • तो एक म्हातारा माणूस होता.

Ex. 4
  • Last year they were in 10th standard.

  • मागील वर्षी ते दहाव्या इयत्तेत होते.

Ex. 5
  • It was a terrible earthquake.

  • तो भूकंप खूप भयानक होता.

This article has been posted on and last updated on by