To have चे Verb - Past Tense


भूतकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद


had हे स्वामित्वदर्शक to have चे Verb नेहमी Past Tense म्हणजे भूतकाळाचे समजले जाते.

वाक्याचा Subject (कर्ता) हा Nominative Case च्या Pronoun किंवा Noun च्या स्वरूपात असतो.

Subject च्या Person (पुरूष) आणि Number (वचन) चा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I had We had
Second Person (द्वितीय पुरुष) You (तू) had You (तुम्ही) had
Third Person (तृतीय पुरुष)

He had


She had


It had


Singular Number Noun + had

They had


Plural Number Noun + had

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • I had a bicycle.

  • माझ्याकडे एक सायकल होती.

Ex. 2
  • He had a note of five hundred rupees.

  • त्याच्याकडे एक पाचशेची नोट होती.

Ex. 3
  • My friend had two dogs.

  • माझ्या मित्राकडे दोन कुत्रे होते.

Ex. 4
  • Vilas had a collection of rare coins.

  • विलासकडे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह होता.

Ex. 5
  • Rajesh had a gold plated pen.

  • राजेशकडे सोन्याचा मुलामा चढवलेलं पेन होतं.

This article has been posted on and last updated on by