To have चे Verb - Past Tense

To have च्या Verb मुळे वाक्यातील Subject च्या Possession (पझेशन) म्हणजे मालकीबद्दल किंवा स्वामित्वाबद्दल माहिती मिळते.

Past Tense (पास्ट टेन्स) चे To have चे Verb म्हणजे भूतकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील Verb चा समावेश होतो –

  • had

इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.

Subject च्या Number चा आणि Person चा Past Tense च्या To have च्या Verb वर काहीही परिणाम होत नाही.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I had
(माझ्याकडे होते)
We had
(आमच्याकडे होते)
Second Person (द्वितीय पुरुष) You had
(तुझ्याकडे होते)
You had
(तुमच्याकडे होते)
Third Person (तृतीय पुरुष)

He had
(त्याच्याकडे होते)


She had
(तिच्याकडे होते)


It had
(त्याच्याकडे / तिच्याकडे होते)


Singular Number Noun + had

They had
(त्यांच्याकडे होते)


Plural Number Noun + had

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • I had a bicycle.
  • माझ्याकडे एक सायकल होती.
Example 2
  • He had a note of five hundred rupees.
  • त्याच्याकडे एक पाचशेची नोट होती.
Example 3
  • My friend had two dogs.
  • माझ्या मित्राकडे दोन कुत्रे होते.
Example 4
  • Vilas had a collection of rare coins.
  • विलासकडे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह होता.
Example 5
  • Rajesh had a gold plated pen.
  • राजेशकडे सोन्याचा मुलामा चढवलेलं पेन होतं.

This article has been first posted on and last updated on by