To have चे Verb - Present Tense


वर्तमानकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद


have आणि has ही स्वामित्वदर्शक to have ची Verbs नेहमी Present Tense म्हणजे वर्तमानकाळाची समजली जातात.

वाक्याचा Subject (कर्ता) हा Nominative Case च्या Pronoun किंवा Noun च्या स्वरूपात असतो.

Subject चे Person (पुरूष) आणि Number (वचन) लक्षात घेऊन योग्य ते To have चे Verb वापरावे लागते.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I have We have
Second Person (द्वितीय पुरुष) You (तू) have You (तुम्ही) have
Third Person (तृतीय पुरुष)

He has


She has


It has


Singular Number Noun + has

They have


Plural Number Noun + have

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • We have twenty cows.

  • आमच्याकडे वीस गायी आहेत.

Ex. 2
  • He has a big collection of books.

  • त्याच्याजवळ पुस्तकांचा मोठा संग्रह आहे.

Ex. 3
  • She has three brothers.

  • तिला तीन भाऊ आहेत.

Ex. 4
  • Ramesh has a house in Mumbai.

  • रमेशचे मुंबईला एक घर आहे.

Ex. 5
  • Trees have many branches.

  • झाडांना खूप फांद्या असतात.

This article has been posted on and last updated on by