To have चे Verb

To have च्या Verb मुळे वाक्यातील Subject च्या Possession (पझेशन) म्हणजे मालकीबद्दल किंवा स्वामित्वाबद्दल माहिती मिळते.

To have च्या Verbs मध्ये पुढील Verbs चा समावेश होतो.

  • have
  • has
  • had
  • shall have
  • will have
नियम १

To have चे Verb हे वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.

नियम २

To have चे Verb हे नेहमी Transitive म्हणजे सकर्मक असते.

नियम ३

वाक्यातील उपयोगानुसार या Verb ला एकतर To have चे Verb किंवा Primary Auxiliary Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

नियम ४
Primary Auxiliary Verb

जेव्हा या Verb ला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्याला Primary Auxiliary Verb असे म्हणतात.

Primary Auxiliary Verb म्हणून जेव्हा ही Verbs वापरली जातात, तेव्हा त्यांचा उपयोग Perfect Tense मध्ये केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
  • We have forgotten the poem.
  • आम्ही कविता विसरलो आहोत.

वरील वाक्यामध्ये have या Verb ला जोडून forgotten हे Past Participle वापरलेले आहे.

या वाक्यात वापरलेले have हे To have चे Verb नसून ते वाक्यातील Past Participle ला सहाय्य करत आहे.

त्यामुळे या वाक्यात have ला Primary Auxiliary Verb समजावे.

नियम ५
To have चे Verb

जेव्हा या Verb ला जोडून एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला To be चे Verb असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • She has a car.
  • तिच्याकडे मोटारगाडी आहे.

वरील वाक्यामध्ये has ला जोडून car हे Common Noun वापरलेले आहे.

has च्या वापरामुळे Subject ची वाक्यातील Object वर असलेली मालकी (Possession) व्यक्त होत आहे.

त्यामुळे या वाक्यात has ला To have चे Verb समजावे.

नियम ६
सजीव प्राण्याबाबत वापरलेले To have चे Verb

एखाद्या सजीव प्राण्याचा शरीराच्या अविभाज्य भागाबद्दल बोलताना To have चे Verb वापरले जाते.

For example (उदाहरणार्थ),
  • A dog has four legs.
  • कुत्र्याला चार पाय असतात.
नियम ७
निर्जीव वस्तूबाबत वापरलेले To have चे Verb

एखाद्या निर्जीव वस्तूचा अविभाज्य भाग दर्शविण्यासाठीसुद्धा To have चे Verb वापरले जाते.

For example (उदाहरणार्थ),
  • My house has two rooms.
  • माझ्या घरामध्ये दोन खोल्या आहेत.

To have च्या Verbs ची विभागणी त्यांच्या काळानुसार पुढीलप्रमाणे केलेली आहे.

Present Tense

Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे To have चे Verb म्हणजे वर्तमानकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील To have च्या Verbs चा समावेश होतो –

  • have
  • has
Read more about Present Tense Verbs
Past Tense

Past Tense (पास्ट टेन्स) चे To have चे Verb म्हणजे भूतकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील To have च्या Verb चा समावेश होतो –

  • had
Read more about Past Tense Verbs
Future Tense

Future Tense (फ्यूचर टेन्स) चे To have चे Verb म्हणजे भविष्यकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील To have च्या Verbs चा समावेश होतो –

  • shall have
  • will have
Read more about Future Tense Verbs

This article has been first posted on and last updated on by