To's Verb


क्रियादर्शक to चे Verb


नियम १

वाक्यातील Subject (कर्ता) कोणती क्रिया (Action) करत आहे याची माहिती To च्या Verb मुळे मिळते.

नियम २

To चे Verb हे वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.

नियम ३

To च्या Verb ला Finite Verb किंवा Main Verb असेही म्हटले जाते.

नियम ४

To चे Verb हे एकतर Transitive (सकर्मक) असते किंवा ते Intransitive (अकर्मक) असते.

To's Verb showing Action
नियम ५

एखादे To चे Verb हे Transitive आहे कि Intransitive आहे हे समजण्यासाठी त्या क्रियेला काय आणि कोणाला हे प्रश्न विचारावेत.

नियम ६

ज्या क्रियेला काय / कोणाला यांपैकी एक किंवा दोन्हीही प्रश्न विचारता येतात, ती क्रिया आणि ते To चे Verb हे नेहमी Transitive (सकर्मक) समजावे.

For example (उदाहरणार्थ):
  • We learn English.
  • आम्ही इंग्रजी शिकतो.

वरील वाक्यामध्ये वाक्याचा Subject (कर्ता) म्हणून We (आम्ही) हे Pronoun वापरले आहे.

तसेच दुसऱ्या स्थानी learn (शिकणे) हे To चे Verb वापरले आहे.

जर आपण या main verb ला काय हा प्रश्न अशाप्रकारे विचारला कि "काय शिकतो?", तर त्याचे उत्तर "इंग्रजी शिकतो"असे येते.

काय हा प्रश्न विचारता येत असल्यामुळे या वाक्यातील main verb हे Transitive (सकर्मक) आहे आणि त्यामुळे त्याला English (इंग्रजी) हे Object (कर्म) जोडलेले आहे.

नियम ७

परंतु, ज्या क्रियेला काय / कोणाला यांपैकी कोणताही प्रश्न विचारता येत नाही, त्या क्रियेला आणि संबंधित To च्या Verb ला Intransitive (अकर्मक) समजावे.

For example (उदाहरणार्थ):
  • Birds fly.
  • पक्षी उडतात.

वरील वाक्यामध्ये वाक्याचा Subject (कर्ता) म्हणून Birds (पक्षी) हे Noun वापरले आहे.

तसेच दुसऱ्या स्थानी fly (उडणे) हे To चे Verb वापरले आहे.

जर आपण या main verb ला काय / कोणाला यांपैकी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही.

"काय उडतो?" / "कोणाला उडतो?" हे प्रश्न "उडणे" या क्रियेच्या संदर्भात अर्थहीन आहेत.

त्यामुळे या वाक्यातील main verb हे Intransitive (अकर्मक) आहे आणि त्याला कोणतेही Object (कर्म) जोडलेले नाही.

नियम ८

दुसऱ्या स्थानातील To चे Verb जेव्हा Transitive (सकर्मक) असते, तेव्हाच वाक्यातील तिसऱ्या स्थानी Object (कर्म) येऊ शकते.

जेव्हा To चे Verb हे Intransitive (अकर्मक) असते, तेव्हा वाक्यातील तिसऱ्या स्थानी Object (कर्म) कधीही येत नाही हे लक्षात ठेवावे.

This article has been posted on and last updated on by