Future Perfect Tense

Future Perfect Tense (फ्यूचर परफेक्ट टेन्स) म्हणजे पूर्ण भविष्यकाळ होय.

जेव्हा एखादी क्रिया लगेच न करता पुढे केव्हातरी आपण ती निश्चित करू असे वाटते. किंबहुना, नुसती करू असे वाटत नाही, तर ती क्रिया आपण नक्की पूर्ण केलेली असेलच अशी जेव्हा आपल्याला खात्री असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी Future Perfect Tense चा उपयोग करतात.

नियम १

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा will have किंवा shall have यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Past Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम २

जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी असेन / असेल / असतील  यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "ल" च्या बाराखडीतील "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Future Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
  • उद्या संध्याकाळपर्यंत माझा भाऊ सोलापूरला पोहोचला असेल.
  • My brother will have reached Solapur till tomorrow evening.

वरील मराठी वाक्यामध्ये असेल  हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "ल" च्या बाराखडीतील पोहोचला हे "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Future Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मुलांनी बागेतील झाडांना पाणी घातले असेल.
  • Children will have watered the plants in the garden.
Example 2
  • पुढील काही दिवसांत पक्षी स्थलांतर करून युरोपातून भारतात आलेले असतील.
  • The birds will have migrated to India from Europe in the next few days.
Example 3
  • मीराने तिच्या वडिलांचा निरोप त्यांच्या मित्राला दिलेला असेल.
  • Meera will have given her father's message to his friend.
Example 4
  • त्यांनी वर्गाची दारं आणि खिडक्या उघडलेली असतील.
  • They will have opened the windows and the doors of the classroom.
Example 5
  • तिने तिचे काम उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण केलेले असेल.
  • She will have completed her work till tomorrow evening.

This article has been first posted on and last updated on by