Present Perfect Tense


पूर्ण वर्तमानकाळ


नियम १

जेव्हा एखादी क्रिया शंभर टक्के नुकतीच पूर्ण झालेली असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी Present Perfect Tense चा उपयोग करतात.

नियम २

इंग्रजी वाक्यात जेव्हा Subject ला जोडून have / has यांपैकी Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत तिसऱ्या स्थानी Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Present Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम ३

जेव्हा मराठी वाक्यात अगदी शेवटी आहे / आहेत / आहोत यांपैकी क्रियापद वापरलेले असते, तसेच त्याच्या अगोदर ला / ली / ले / ल्या यांपैकी अक्षर जोडलेले "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा असे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.

Present Perfect Tense
Examples (उदाहरणार्थ)
 • एका खोडकर मुलाने खुर्ची मोडली आहे.
 • A mischievous boy has broken the chair.
 • आम्ही कविता विसरलो आहोत.
 • We have forgotten the poem.
 • तू तुझे काम सुरू केले आहे.
 • You have begun your work.
 • तुम्ही निवेदन लिहिले आहे.
 • You have written the report.
 • त्याने नवीन चित्रपट पाहिला आहे.
 • He has seen the new movie.
 • तिने तिची वही तिच्या मैत्रिणीला दिली आहे.
 • She has given her notebook to her friend.
 • त्यांनी त्यांची गणिते त्यांच्या शिक्षकांना दाखवली आहेत.
 • They have shown their examples to their teacher.
 • केदारने संपूर्ण बाग झाडली आहे.
 • Kedar has swept the whole garden.
 • मुलांनी त्यांची पुस्तके टेबलावर ठेवली आहेत.
 • Children have kept their books on the table.
 • आईने सकाळी न्याहारी बनवली आहे.
 • Mother has made breakfast in the morning.

This article has been posted on and last updated on by