Simple Future Tense


साधा भविष्यकाळ


नियम १

जेव्हा एखादी क्रिया पुढे केव्हातरी होणार आहे असे सूचित करायचे असते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी Simple Future Tense चा उपयोग करतात.

नियम २

इंग्रजी वाक्यात जेव्हा Subject ला जोडून shall / will यांपैकी Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत तिसऱ्या स्थानी Present Tense चे (पहिल्या रूपाचे) To चे Verb वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Future Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम ३

मराठी वाक्यात शेवटी वापरलेले क्रियापद, त्याची क्रिया आणि उच्चार लक्षात घेऊन ही क्रिया झालेली आहे कि अद्याप व्हायची आहे, हे लक्षात घ्यावे लागते. क्रियापदाच्या उच्चारावरून जर असे लक्षात आले कि ही क्रिया अद्याप व्हायची आहे, तर असे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

Simple Future Sentence
Examples (उदाहरणार्थ)
  • उद्या ही गाडी मुंबईहून पुण्याला जाईल.
  • The bus will go to Pune from Mumbai tomorrow.
  • मी घरी पोचल्यावर तुला फोन करेन.
  • I will call you when I reach home.
  • आम्हाला तुमची मदत लागेल.
  • We will need your help.
  • पक्षी या झाडावर घरटी बांधतील.
  • Birds will build their nests on this tree.
  • माझ्या वाढदिवसाला मला भरपूर भेटवस्तू मिळतील.
  • I will get a lot of gifts on my birthday.

This article has been posted on and last updated on by