Simple Past Tense


साधा भूतकाळ


नियम १

जेव्हा एखादी क्रिया होऊन गेलेली असते, तेव्हा अशी घडून गेलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी Simple Past Tense चा उपयोग करतात.

नियम २

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा Past Tense चे (दुसऱ्या रूपाचे) To चे Verb वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Past Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम ३

जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला / ली / ले / ल्या यांपैकी असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

Simple Past Sentence
Examples (उदाहरणार्थ)
 • मी नवीन फळा आणला.
 • I brought a new blackboard.
 • आम्ही सफरचंद विकत घेतले.
 • We bought apples.
 • तू चोर पकडलास.
 • You caught a thief.
 • तिने तिची सर्व संपत्ती देशाला दिली.
 • She gave all her wealth to the country.
 • त्यांनी पतंग विकत घेतले.
 • They bought kites.
 • किशोरने फांदी मोडली.
 • Kishore broke a branch.
 • माझ्या वडिलांनी खुर्ची कोपऱ्यात ठेवली.
 • My father put the chair in the corner.
 • माझ्या भावाने झाडूने सर्व बाग झाडली.
 • My brother swept the whole garden with a broom.
 • काल गोपाळने केळी विकली.
 • Gopal sold bananas yesterday.

This article has been posted on and last updated on by