Simple Present Tense


साधा वर्तमानकाळ


नियम १

जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने चालते, तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी Simple Present Tense चा उपयोग करतात.

नियम २

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा Present Tense चे (पहिल्या रूपाचे) To चे Verb वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Present Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम ३

जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर “त” च्या बाराखडीतील असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Present Tense चा उपयोग करावा लागतो.

Simple Present Sentence
नियम ४

इंग्रजी वाक्य जेव्हा Simple Present Tense मध्ये लिहिलेले असते, तेव्हा वाक्याच्या दुसऱ्या स्थानांतील To च्या Verb ला एकतर s / es / ies यांपैकी प्रत्यय लावलेला असतो किंवा कोणताही प्रत्यय लावलेला नसतो.

नियम ५

वाक्याचा Subject म्हणून जर He / She / It किंवा Proper Noun किंवा Singular Common Noun वापरलेले असेल, तर To च्या Verb ला जरूरीप्रमाणे s / es / ies यांपैकी योग्य तो प्रत्यय लावावा.

नियम ६

वाक्याचा Subject म्हणून जर I / We / You / They किंवा Plural Common Noun वापरलेले असेल, तर To च्या Verb ला कोणताही प्रत्यय लावू नये.

Examples (उदाहरणार्थ)
  • मी सकाळी लवकर उठतो.
  • I wake up early in the morning.
  • ते कामाला जाताना स्वतःच्या गाडीने प्रवास करतात.
  • They travel to work by their own car.
  • ते फुल नाजूक दिसते.
  • The flower looks delicate.
  • अंधेरीला जाणारी मेट्रो ट्रेन घाटकोपर वरून दर १५ मिनिटांनी सुटते.
  • The metro train to Andheri from Ghatkopar leaves every fifteen minutes.
  • मुलं आणि मुली एकाच वर्गात बसतात.
  • Boys and girls sit in the same class.

This article has been posted on and last updated on by