Compound Preposition “outside”

outside (आऊटसाइड) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये outside चा उपयोग Noun, Adjective, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये outside चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

outside = ..च्या बाहेर (बाहेरील बाजूस)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He has parked his car outside the house.
  • त्याने आपली गाडी घराबाहेर (घराच्या बाहेरील बाजूस) लावली आहे.
Example 2
  • They were waiting for him outside the door.
  • ते दरवाजाच्या बाहेर (दरवाजाच्या बाहेरील बाजूस) त्याची वाट पाहत होते.

outside चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये inside या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द म्हणजेच Antonym (ऍन्टोनिम) म्हणूनदेखील करता येतो.

This article has been first posted on and last updated on by