had to ची रचना

जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला करावी लागत असे किंवा ती गोष्ट करावी लागली, असे म्हणावयाचे असते तेव्हा had to (हॅड टू) ची रचना वापरली जाते.

नियम १

या रचनेमध्ये had ला जोडून एखादे Infinitive वापरलेले असते. त्यामुळे या रचनेला had to ची रचना असे म्हणतात.

नियम २

had to ची रचना नेहमी Past Tense (पास्ट टेन्स) ची म्हणजेच भूतकाळाची समजली जाते.

नियम ३

had to च्या रचनेमध्ये had या क्रियापदाचा वापर वाक्यातील Main Verb म्हणून केलेला असतो.

त्यामुळे या रचनेतील वाक्यामध्ये had ला To have चे Verb किंवा Auxiliary Verb समजू नये.

नियम ४

वाक्याच्या Subject चे Person आणि Number यांचा had च्या स्वरूपावर काहीही परिणाम होत नाही.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person
(प्रथम पुरुष)
I had to We had to
Second Person
(द्वितीय पुरुष)
You had to
(तू)
You had to
(तुम्ही)
Third Person
(तृतीय पुरुष)
He had to They had to
She had to
It had to
Singular Noun
+
had to
Plural Noun
+
had to
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • रमेशला रोज सकाळी वर्तमानपत्रे वाटायला जावं लागत असे.
  • Ramesh had to distribute newspapers in the morning.
Example 2
  • त्याला दररोज बाहेरचं जेवण खावं लागत असे.
  • He had to eat outside food everyday.
Example 3
  • लहानपणी मला माझ्या बाबांसाठी जेवणाचा डबा घेऊन जावं लागत असे.
  • I had to take the tiffin box for my father in my childhood days.
Example 4
  • माझी मोटारगाडी चालू होत नसल्यामुळे मला बसने जावं लागलं.
  • I had to take a bus since my car could not start.
Example 5
  • त्याला तिच्यासाठी एक तास थांबावं लागलं.
  • He had to wait for her for an hour.

This article has been first posted on and last updated on by