shall have to आणि will have to


shall have, will have आणि infinitiveshall have to आणि will have to ची रचना

जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात करणे एखाद्या व्यक्तीला बंधनकारक असते, तेव्हा ती व्यक्त करण्यासाठी shall have to (शाल हॅव् टू) आणि will have to (विल हॅव् टू) ची रचना वापरली जाते.

नियम १

या रचनेमध्ये shall have किंवा will have ला जोडून एखादे Infinitive वापरलेले असते. त्यामुळे या रचनेला shall have to किंवा will have to ची रचना असे म्हणतात.

नियम २

shall have to आणि will have to ची रचना नेहमी Future Tense (फ्यूचर टेन्स) म्हणजेच भविष्यकाळाची समजली जाते.

नियम ३

जरी या रचनेमध्ये shall have किंवा will have वापरलेले असले, तरी सुद्धा या वाक्याला Future Perfect Tense चे वाक्य समजू नये.

Perfect Tense च्या वाक्यामध्ये shall have किंवा will have ला जोडून त्यासोबत Past Participle वापरलेले असते.

मात्र, shall have to आणि will have to च्या रचनेमध्ये shall have किंवा will have ला जोडून त्यासोबत एखादे Infinitive वापरलेले असते.

नियम ४

वाक्याच्या Subject च्या Number चा shall have किंवा will have च्या स्वरूपावर काहीही परिणाम होत नाही.

परंतु, वाक्याचा Subject हा कोणत्या Person मध्ये आहे, हे लक्षात घेऊन shall have किंवा will have यांपैकी योग्य ते क्रियापद वापरावे लागते.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person
(प्रथम पुरुष)
I shall have to We shall have to
Second Person
(द्वितीय पुरुष)
You will have to
(तू)
You will have to
(तुम्ही)
Third Person
(तृतीय पुरुष)
He will have to They will have to
She will have to
It will have to
Singular Noun
+
will have to
Plural Noun
+
will have to
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • उद्या सकाळी मला घरातून लवकर निघावे लागेल.
  • I shall have to leave home early in the morning.
Example 2
  • डॉक्टर होण्यासाठी दिनेशला आर्थिक मदत घ्यावी लागेल.
  • Dinesh will have to take financial help to become a doctor.
Example 3
  • हृदयाचे विकार टाळण्यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल.
  • You will have to exercise daily to avoid heart problems.
Example 4
  • सूर्योदय बघण्यासाठी तुला सकाळी लवकर उठावे लागेल.
  • You will have to wake up early in the morning to watch the sunrise.
Example 5
  • पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्याला भरपूर झाडं लावावी लागतील.
  • We shall have to plant more trees to protect the environment.

This article has been first posted on and last updated on by