Simple Past Tense

Simple Past Tense (सिम्पल पास्ट टेन्स) म्हणजे साधा भूतकाळ होय.

जेव्हा एखादी क्रिया होऊन गेलेली असते, तेव्हा अशी घडून गेलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी Simple Past Tense चा उपयोग करतात.

नियम १

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा Past Tense चे म्हणजे दुसऱ्या रूपाचे  To चे Verb वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Past Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम २

जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • मी नवीन फळा आणला.
 • I brought a new blackboard.

वरील मराठी वाक्यामध्ये आणला हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to bring या To च्या Verb चे दुसरे रूप brought वापरलेले आहे.

Example 2
 • आम्ही सफरचंद विकत घेतले.
 • We bought apples.

वरील मराठी वाक्यामध्ये घेतले हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to buy या To च्या Verb चे दुसरे रूप bought वापरलेले आहे.

Example 3
 • तिने चोराला पकडले.
 • She caught a thief.

वरील मराठी वाक्यामध्ये पकडले हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to catch या To च्या Verb चे दुसरे रूप caught वापरलेले आहे.

Example 4
 • त्याने त्याची सर्व संपत्ती देशाला दिली.
 • He gave all his wealth to the country.

वरील मराठी वाक्यामध्ये दिली हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to give या To च्या Verb चे दुसरे रूप gave वापरलेले आहे.

Example 5
 • किशोरने फांदी मोडली.
 • Kishore broke a branch.

वरील मराठी वाक्यामध्ये मोडली हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to break या To च्या Verb चे दुसरे रूप broke वापरलेले आहे.

Example 6
 • माझ्या वडिलांनी खुर्ची कोपऱ्यात ठेवली.
 • My father put the chair in the corner.

वरील मराठी वाक्यामध्ये ठेवली हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to put या To च्या Verb चे दुसरे रूप put वापरलेले आहे.

Example 7
 • माझ्या भावाने झाडूने सर्व बाग झाडली.
 • My brother swept the whole garden with a broom.

वरील मराठी वाक्यामध्ये ठेवली हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to sweep या To च्या Verb चे दुसरे रूप swept वापरलेले आहे.

Example 8
 • काल गोपाळने केळी विकली.
 • Gopal sold bananas yesterday.

वरील मराठी वाक्यामध्ये विकली हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर "ल" च्या बाराखडीतील आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Past Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Past Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी to sell या To च्या Verb चे दुसरे रूप sold वापरलेले आहे.

This article has been first posted on and last updated on by