Learn English grammar


आपल्या भाषेत इंग्रजी व्याकरण शिका

Know More

कुठलीही भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते त्या भाषेचे व्याकरण; कारण व्याकरणामुळे ती भाषा समजणे तसेच त्या भाषेत योग्य प्रकारे स्वतःचे विचार व्यक्त करणे अगदी सहज आणि सोपे होऊन जाते. त्यामुळे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्रजीचे व्याकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.


मराठी भाषिकांना इंग्रजी शिकणे सोपे व्हावे आणि त्यांना ते मराठी माध्यमातून शिकता यावे या हेतूने आम्ही इथे मराठी माध्यमातून इंग्रजी व्याकरणाच्या संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण देत आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहील आणि आपल्या भाषेत समजल्यामुळे त्याचा वापर करणे अधिक सोपे होईल.