Parts of Sentence


वाक्याचे भाग



इंग्रजी Sentence (वाक्य) ची रचना करताना विविध घटकांचा वाक्याच्या विविध स्थानी उपयोग केला जातो.

इंग्रजी वाक्याचे हे घटक पुढीलप्रमाणे आहेत.

Subject

Subject (सब्जेक्ट) म्हणजे वाक्याचा कर्ता होय.

इंग्रजी वाक्यातील पहिले स्थान हे नेहमी वाक्याच्या Subject चे म्हणजेच कर्त्याचे असते.

Read more about Subject
Verb

Verb (व्हर्ब) म्हणजे वाक्यातील क्रियापद होय.

इंग्रजी वाक्यातील दुसरे स्थान हे नेहमी वाक्याच्या Verb चे म्हणजेच क्रियापदाचे असते.

Read more about Verb
Object

Object (ऑब्जेक्ट) म्हणजे वाक्यातील सकर्मक क्रियापदाचे कर्म होय.

इंग्रजी वाक्यातील तिसरे स्थान हे वाक्यातील Object चे म्हणजेच कर्माचे असू शकते.

Read more about Object
Complement

Complement (कॉम्प्लिमेंट) म्हणजे वाक्यातील अकर्मक क्रियापदाचे पूरक होय.

इंग्रजी वाक्यातील तिसरे स्थान हे वाक्यातील Complement चे म्हणजेच पूरकाचे असू शकते.

Read more about Complement

This article has been first posted on and last updated on by