Alternative Coordinating Conjunction


पर्यायदर्शक सम-संयोगी उभयान्वयी अव्ययAlternative Coordinating Conjunction

Alternative Coordinating Conjunction (ऑल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्) म्हणजे पर्यायदर्शक सम-संयोगी उभयान्वयी अव्यय होय.

Alternative Coordinating Conjunction हा एक Coordinating Conjunction चा प्रकार आहे.

नियम १

Alternative Coordinating Conjunction चा उपयोग पूर्णपणे स्वतंत्र असलेली समान दर्जाची उपवाक्ये म्हणजेच Coordinating Clauses एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो.

तसेच, समान दर्जाचे शब्द किंवा Phrases अथवा Simple Sentences यांना जोडण्यासाठीसुद्धा Alternative Coordinating Conjunction चा उपयोग केला जातो.

नियम २

Alternative Coordinating Conjunction करून तयार झालेल्या वाक्याला Compound Sentence (कम्पाउंड सेन्टेन्स) म्हणजेच संयुक्त वाक्य असे म्हणतात.

नियम ३

Alternative Coordinating Conjunction ने जेव्हा दोन किंवा अधिक वाक्ये एकमेकांना जोडलेली असतात, खरंतर ती वाक्ये एकमेकांना त्यांचे पर्याय म्हणून जोडलेली असतात.

त्यामुळे त्याला Alternative (ऑल्टरनेटिव्ह) म्हणजे पर्यायदर्शक अशी संज्ञा दिलेली आहे.

For example (उदाहरणार्थ),
  • एकतर तू इकडे ये किंवा मी तिथे येईन.
  • Either you come here or I will come there.

वरील वाक्यामध्ये You come here आणि I will come there ही दोन वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी either...or  या Coordinating Conjunction चा उपयोग केला आहे.

या दोन्हीही वाक्यांचे अर्थ एकमेकांना पर्यायी असल्यामुळे either...or  ला Alternative Coordinating Conjunction ही संज्ञा दिलेली आहे.

Alternative Coordinating Conjunctions ची यादी
Conjunction
(उभयान्वयी अव्यय)
Marathi Meaning
(मराठी अर्थ)
or
(ऑर)
अथवा, किंवा
either...or
(आयदर...ऑर)
दोहोंपैकी एक, एकतर हे नाहीतर ते
neither...nor
(नायदर...नॉर)
दोहोंपैकी एकही नाही, हेही नाही आणि तेही नाही

This article has been first posted on and last updated on by