Conjunction म्हणजे काय?

Conjunction (कंजंक्शन्) म्हणजे उभयान्वयी अव्यय होय.

Conjunction हे वाक्यातील दोन किंवा अधिक शब्दांना जोडण्याचे काम करते.

त्याचप्रमाणे, Conjunction चा उपयोग दोन किंवा अधिक वाक्ये जोडण्यासाठीसुद्धा केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
  • खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आपण घरी जायला हवे.
  • It is late so we should go home.

वरील वाक्यामध्ये It is late आणि we should go home या दोन वाक्यांना जोडण्याचे काम so हे Conjunction करत आहे.

इंग्रजी व्याकरणातील Adverbs ची विभागणी पुढीलप्रमाणे एकूण दोन मुख्य प्रकारांमध्ये केलेली आहे.

Coordinating Conjunction

Coordinating Conjunction (कोऑर्डिनेटिंग् कंजंक्शन्) म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.

समान दर्जाचे शब्द, शब्दसमूह किंवा वाक्ये जोडण्यासाठी Coordinating Conjunction चा उपयोग केला जातो.

यामध्ये and, or, either...or, neither...nor, but, so इत्यादी Conjunctions चा समावेश होतो.

Read more about Coordinating Conjunction
Subordinating Conjunction

Subordinating Conjunction (कोऑर्डिनेटिंग् कंजंक्शन्) म्हणजे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.

Complex Sentence मधील पोटवाक्याचा / गौणवाक्याचा संबंध मुख्यवाक्याशी जोडण्यासाठी Subordinating Conjunction चा उपयोग केला जातो.

यामध्ये unless, as, though, although, while, that इत्यादी Conjunctions चा समावेश होतो.

Read more about Subordinating Conjunction

This article has been first posted on and last updated on by