Noun म्हणजे काय?

जगातील प्रत्येक गोष्टीला, वस्तूला किंवा व्यक्तीला आपण कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखतो.

अशा प्रत्येक नावाला इंग्रजी व्याकरणामध्ये Noun (नाऊन) म्हणजेच नाम असे म्हणतात.

इंग्रजी व्याकरणातील Nouns ची विभागणी पुढीलप्रमाणे एकूण सहा प्रकारांमध्ये केलेली आहे.

Common Noun

Common Noun (कॉमन नाऊन) म्हणजे सामान्यनाम होय.

प्रत्येक निर्जीव वस्तूला किंवा सजीव प्राण्याला आपण ज्या नावाने ओळखतो, त्या नावाला Common Noun म्हणजे सामान्यनाम असे म्हणतात.

Read more about Common Noun
Proper Noun

Proper Noun (प्रॉपर नाऊन) म्हणजे विशेषनाम होय.

सामान्यनामाच्या ठेवलेल्या विशेषनामाला Proper Noun असे म्हणतात.

Read more about Proper Noun
Abstract Noun

Abstract Noun (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन) म्हणजे भाववाचक नाम होय.

Abstract या शब्दाचा अर्थ काल्पनिक असा होतो. या noun ची जाणीव त्याच्या अर्थावरून आपल्या मनाला होते.

Read more about Abstract Noun
Material Noun

Material Noun (मटेरियल नाऊन) म्हणजे पदार्थवाचक नाम होय.

दुधासारखे द्रवपदार्थ / भातासारखे धान्यपदार्थ / लोण्यासारखे खाद्यपदार्थ यांच्या तसेच विविध धातूंच्या नावांना Material Noun असे म्हणतात.

Read more about Material Noun
Collective Noun

Collective Noun (कलेक्टिव्ह नाऊन) म्हणजे समूहवाचक नाम होय.

समान आणि सारख्या असणाऱ्या व्यक्ती / प्राणी / वस्तू यांचा समूह किंवा समुदाय दर्शविण्यासाठी Collective Noun चा उपयोग केला जातो.

Read more about Collective Noun
Agent Noun

Agent Noun (एजंट नाऊन) म्हणजे व्यवसायदर्शक / कृतीदर्शक नाम होय.

एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय दर्शविण्यासाठी किंवा एखादी कृती करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी Agent Noun चा उपयोग केला जातो.

Read more about Agent Noun

This article has been first posted on and last updated on by