would have


"would have" चा वाक्यातील उपयोगPast Modal Verb “would have”

एखादी गोष्ट ज्यावेळी करणे आवश्यक असते, त्यावेळी ती न करता तशीच सोडून दिल्यानंतर कालांतराने ती गोष्ट आपण केली असती, असे आपल्या मनात येते.

अशी भावना व्यक्त करण्यासाठी would have (वुड हॅव्) चा उपयोग केला जातो.

would have च्या रचनेमध्ये ती क्रिया प्रत्यक्षात घडलेली नसते, हे लक्षात ठेवावे.

would have ची रचना

would have च्या रचनेमध्ये would have ला जोडून नेहमी एखाद्या Past Participle चा उपयोग केला जातो.

would have च्या रचनेचे नकारार्थी स्वरूप  would not have असे करावे लागते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • राजूने आम्हाला आमच्या अडचणीत मदत केली असती.
  • Raju would have helped us in our difficulty.
Example 2
  • माझ्या वडिलांना कोणाकडूनही मदत मिळाली नाही. नाहीतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले असते.
  • My father did not get help from anybody. Otherwise, he would have gone to America for higher education.
Example 3
  • तिने एकाग्रतेने अभ्यास केला असता, तर ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असती.
  • If she had studied hard, she would have passed in the examination.

This article has been first posted on and last updated on by