To be चे Verb - Present Tense

वाक्यातील Subject कोणत्या State (स्टेट) म्हणजे स्थितीमध्ये आहे याची माहिती To be च्या Verb मुळे मिळते.

Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे To be चे Verb म्हणजे वर्तमानकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील Verbs चा समावेश होतो –

  • am
  • is
  • are

am, is आणि are च्या वाक्यातील उपयोगानुसार त्यांना Primary Auxiliary Verb किंवा To be चे Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.

वाक्यातील Subject चे Person आणि Number लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I am
(मी आहे)
We are
(आम्ही आहोत)
Second Person (द्वितीय पुरुष) You are
(तू आहेस)
You are
(तुम्ही आहात)
Third Person (तृतीय पुरुष)

He is
(तो आहे)


She is
(ती आहे)


It is
(तो / ती / ते आहे)


Singular Number Noun + is

They are
(ते आहेत)


Plural Number Noun + are

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • A dog is a four-legged animal.
  • कुत्रा एक चार पायांचा प्राणी आहे.
Example 2
  • They are farmers.
  • ते शेतकरी आहेत.
Example 3
  • I am very tired.
  • मी खूप दमलो आहे.
Example 4
  • English is a global language.
  • इंग्रजी एक जागतिक भाषा आहे.
Example 5
  • Physics, Chemistry and Biology are different branches of Science.
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.

This article has been first posted on and last updated on by