bring

इंग्रजी व्याकरणामध्ये bring (ब्रिंग) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.

bring चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –

 • आणणे
 • घेऊन येणे
 • घडवून आणणे
bring ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
bring
(ब्रिंग)
brought
(ब्रॉट)
brought
(ब्रॉट)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Mother brought vegetables from the market.
 • आई बाजारातून भाज्या घेऊन आली.
Example 2
 • His life story brought tears to my eyes.
 • त्याच्या जीवनगाथेने माझ्या डोळ्यांत अश्रू आणले.
 • त्याची जीवनगाथा ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
Example 3
 • War always brings misery.
 • युद्ध नेहमी दुःखच आणते.
 • युद्धामुळे नेहमी दुःखच मिळते.
Example 4
 • Rajesh brings books from the library every month.
 • राजेश दरमहा वाचनालयातून पुस्तके घेऊन येतो.
Example 5
 • She had brought a gift for her mother.
 • ती तिच्या आईसाठी भेटवस्तू घेऊन आली होती.

This article has been first posted on and last updated on by