Distributive Adjective म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख एकमेवपणे किंवा स्वतंत्रपणे करण्यासाठी जे Adjective वापरले जाते, त्याला Distributive Adjective (डिस्ट्रिब्युटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजेच वितरणदर्शक विशेषण असे म्हणतात.

Distributive Adjectives पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

each = प्रत्येक

इंग्रजी वाक्यामध्ये each (ईच) चा उपयोग Distributive Adjective म्हणून करता येतो.

दोन किंवा अधिक व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समूहाचा उल्लेख करताना त्यांपैकी प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तूबद्दल अधिक माहिती देण्यासाठी each चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Each student had a different opinion.
 • प्रत्येक विद्यार्थ्याचं मत वेगळं होतं.
Example 2
 • She cut the cake into five pieces and gave a slice to each child.
 • तिने केकचे पाच तुकडे केले आणि प्रत्येक मुलाला एक तुकडा दिला.
every = प्रत्येक, दर

इंग्रजी वाक्यामध्ये every (एव्हरी) चा उपयोग Distributive Adjective म्हणून करता येतो.

Every चा उपयोग each प्रमाणेच करता येतो. मात्र, यांमध्ये नेहमी दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समूहाचा उल्लेख केला जातो.

त्याचप्रमाणे, जेव्हा एखाद्या कालावधीनंतर एखादी गोष्ट घडते, असे सांगायचे असते, तेव्हा त्या कालावधीचा उल्लेख करण्यासाठी every चा उपयोग करता येतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Every man in the group had gun.
 • जमावातील प्रत्येक माणसाकडे बंदूक होती.
Example 2
 • He was checking the status of their work every four hours.
 • तो दर (प्रत्येक) चार तासांनी त्यांच्या कामाची स्थिती तपासत होता.
either = दोन्हींपैकी एखादा, दोन्हीही

इंग्रजी वाक्यामध्ये either (आयदर) चा उपयोग Distributive Adjective म्हणून करता येतो.

दोन व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना either चा उपयोग केला जातो.

जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तूंपैकी एखादा/एखादी असा उल्लेख करावयाचा असतो, तेव्हा either चा वापर करण्यात येतो.

तसेच, दोन व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख करताना त्या दोहोंबद्दल बोलावयाचे असते, तेव्हादेखील either चा वापर करता येतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • You can use either hand to lift the goods.
 • सामान उचलण्यासाठी तुम्ही दोहोंपैकी कोणताही हात वापरू शकता.

वरील वाक्यामध्ये either चा उपयोग दोन हातांपैकी एक असा उल्लेख करण्यासाठी केलेला आहे.

Example 2
 • The river was overflowing on either side.
 • नदी दोन्हीही बाजूंनी दुथडी भरून वाहत होती.

वरील वाक्यामध्ये either चा उपयोग नदीच्या दोन्हीही बाजू असा उल्लेख करण्यासाठी केलेला आहे.

neither = दोन्हींपैकी एकही नाही

इंग्रजी वाक्यामध्ये neither (नायदर) चा उपयोग Distributive Adjective म्हणून करता येतो.

Neither हे खरंतर either चे नकारार्थी स्वरूप आहे.

जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तूंपैकी एकही नाही असा उल्लेख करावयाचा असतो, तेव्हा neither चा वापर करण्यात येतो.

ज्या वाक्यामध्ये neither वापरलेले असते, त्यामध्ये नकारार्थी अर्थ दर्शविण्यासाठी not वापरण्याची गरज नसते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • You should take neither side.
 • तुम्ही दोन्हींपैकी एकही बाजू घेऊ नये.
Example 2
 • Neither statement is true.
 • दोन्हींपैकी एकही विधान खरे नाही आहे.

This article has been first posted on and last updated on by