Collective Noun म्हणजे काय?

समान आणि सारखे असणारे सजीव प्राणी किंवा निर्जीव वस्तू यांचा एकजिनसी समूह दर्शविण्यासाठी Collective Noun (कलेक्टिव्ह नाऊन) म्हणजेच समूहवाचक नाम वापरले जाते.

नियम १

प्रत्येकी समान आणि सारख्या असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात एकत्रितपणे विचारात घेऊन Collective Noun वापरले जाते.

Collective Noun
(समूहवाचक नाम)
वाक्यातील अर्थ
army
(सैन्य)
an army of soldiers
(सैनिकांचे सैन्य)
class
(वर्ग)
a class of students
(विद्यार्थ्यांचा वर्ग)
team
(संघ)
a team of players
(खेळाडूंचा संघ)
crowd
(घोळका)
a crowd of people
(लोकांचा घोळका)
jury
(न्यायमंडळ)
a jury of jurors
(पंचांचे न्यायमंडळ)
gang
(टोळी)
a gang of criminals
(गुन्हेगारांची टोळी)
नियम २

प्रत्येकी समान आणि सारख्या असणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात एकत्रितपणे विचारात घेऊन Collective Noun वापरले जाते.

Collective Noun
(समूहवाचक नाम)
वाक्यातील अर्थ
flock
(कळप)
a flock of sheep
(मेंढ्यांचा कळप)
herd
(कळप)
a herd of buffaloes
(म्हशींचा कळप)
pack
(कळप)
a pack of wolves
(कोल्ह्यांचा कळप)
swarm
(थवा)
a swarm of insects
(कीटकांचा थवा)
shoal
(थवा)
a shoal of fish
(माशांचा थवा)
नियम ३

प्रत्येकी समान आणि सारख्या असणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात एकत्रितपणे विचारात घेऊन Collective Noun वापरले जाते.

Collective Noun
(समूहवाचक नाम)
वाक्यातील अर्थ
heap
(ढीग)
a heap of stones
(दगडांचा ढीग)
bunch
(गुच्छ)
a bunch of flowers
(फुलांचा गुच्छ)
series
(मालिका)
a series of Harry Potter books
(हॅरी पॉटर पुस्तकांची मालिका)
set
(संच)
a set of books
(पुस्तकांचा संच)
pile
(रास)
a pile of clothes
(कपड्यांची रास)
नियम ४
Collective Noun चे वचन

Collective Noun सामान्यतः Singular Number च्या स्वरूपामध्ये वाक्यात वापरले जाते.

परंतु, जेव्हा अनेक समूहांचा उल्लेख करावयाचा असतो, तेव्हा ते Plural Number च्या स्वरूपामध्ये वाक्यात वापरले जाते.

उदाहरणार्थ –
  • Teams of all nations had come to play in the World Cup.
  • सर्व देशांचे संघ विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी आले होते.

वरील वाक्यामध्ये team या Collective Noun चे teams हे Plural Number चे स्वरूप वापरलेले आहे.

त्याचा अर्थ विविध देशांचे अनेक संघ असा आहे.

नियम ५

काही विशिष्ट Collective Nouns ही Singular Number दिसत असली तरीसुद्धा Plural Number स्वरूपात वापरली जातात.

उदाहरणार्थ –
Example 1
  • These are our cattle.
  • ही आमची गुरंढोरं आहेत.
Example 2
  • Many people travel by bus every day.
  • बसने खूप माणसे प्रवास करतात.

This article has been first posted on and last updated on by