Compound Preposition “except” आणि “except for”

except (एक्सेप्ट) किंवा except for (एक्सेप्ट फॉर) हे एक Compound Preposition आहे.

except आणि except for या दोन्हींचा अर्थ सारखाच आहे हे लक्षात ठेवावे.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये except किंवा except for चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

except / except for = खेरीज, शिवाय, व्यतिरिक्त, सोडल्यास

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • There was nobody in the room except for Ajay.
  • अजयखेरीज (अजय सोडल्यास) त्या खोलीमध्ये दुसरे कोणीही नव्हते.
Example 2
  • Everyone in my family can sing except my father.
  • माझ्या बाबांखेरीज (बाबा सोडल्यास) माझ्या कुटुंबामध्ये सर्वांना गाता येतं.

This article has been first posted on and last updated on by