Compound Preposition “toward” किंवा “towards”

toward (टोवर्ड) किंवा towards (टोवर्ड्स) हे एक Compound Preposition आहे.

toward आणि towards या दोन शब्दांमध्ये फक्त एका S या अक्षराचा फरक आहे. मात्र, या दोन्हीही शब्दांचा अर्थ सारखाच आहे.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये toward किंवा towards चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

towards = कडे (..च्या दिशेने)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The train was coming towards the station.
  • गाडी स्थानकाकडे (स्थानकाच्या दिशेने) येत होती.
Example 2
  • He turned toward the door.
  • तो दरवाज्याकडे (दरवाजाच्या दिशेने) वळला.

towards = एखाद्या विषयासंबंधी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • What is Government's attitude towards free education?
  • मोफत शिक्षणासंबंधी सरकारचा दृष्टीकोन काय आहे?
Example 2
  • My feelings have changed toward her.
  • तिच्यासंबंधीच्या माझ्या भावना आता बदलल्या आहेत.

towards = ..च्या हेतूने (..च्या दृष्टीने)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • I have started saving money towards my higher education.
  • माझ्या उच्च शिक्षणासाठी (उच्च शिक्षणाच्या हेतूने) मी पैसे साठवायला सुरूवात केली आहे.
Example 2
  • Government is working toward eradicating discrimination.
  • भेदभाव निर्मूलनाच्या दृष्टीने सरकार काम करत आहे.

towards = जवळ, आसपास (जरा अगोदर)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He reached home towards midnight.
  • तो मध्यरात्रीच्या आसपास (मध्यरात्रीच्या जरा अगोदर) घरी पोचला.
Example 2
  • Account audit is scheduled toward the end of the year.
  • खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी वर्षाखेरीस (वर्ष संपण्याचा जरा अगोदर) नियोजित केलेली आहे.

This article has been first posted on and last updated on by