Simple Preposition “for”

for (फॉर) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये for  चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

for = साठी, करिता (..कारणामुळे)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • They were punished for creating trouble in the class.
 • वर्गात मस्ती केल्यामुळे (मस्ती करण्याच्या कारणामुळे) त्यांना शिक्षा करण्यात आली.
Example 2
 • She could not buy the new dress for want of money.
 • तिच्याकडे पैसे कमी असल्यामुळे (असण्याच्या कारणामुळे) नवीन कपडे खरेदी करता आले नाहीत.

for = साठी, करिता (उद्देश)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Let us go for a walk in the park.
 • आपण चालण्यासाठी (चालण्याच्या उद्देशाने) उद्यानात जाऊया.
Example 2
 • We have kept that cup for coffee.
 • आम्ही तो पेला कॉफीसाठी (कॉफी घेण्याच्या उद्देशाने) ठेवला आहे.

for = साठी, करिता (काहीतरी मिळवण्यासाठी)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • He reads books for pleasure.
 • तो आनंदासाठी (आनंद मिळवण्यासाठी) पुस्तके वाचतो.
Example 2
 • They ran the race for the prize.
 • ते शर्यतीत बक्षिसासाठी (बक्षीस मिळवण्यासाठी) धावले.

for = साठी, करिता (..च्या दिशेने, स्थलवाचक)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • This bus leaves for Mumbai at 5 o'clock.
 • ही बस मुंबईसाठी (मुंबईच्या दिशेने) पाच वाजता निघते.
Example 2
 • My father will leave for Delhi tomorrow.
 • माझे बाबा दिल्लीसाठी (दिल्लीच्या दिशेने) उद्या निघतील.

for = च्या बद्दल, च्या ऐवजी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • I will give you my book for your notebook.
 • मी तुला तुझ्या वहीच्या बदल्यात माझं पुस्तक देईन.
Example 2
 • She brought a new frock for the old one.
 • तिने जुन्या झग्याच्या बदल्यात नवीन झगा आणला.

for = अवधी दर्शविण्यासाठी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • He was our teacher for two years.
 • ते दोन वर्ष आमचे शिक्षक होते.
Example 2
 • She is on leave for a whole week.
 • ती संपूर्ण आठवडा सुट्टीवर आहे.

This article has been first posted on and last updated on by