may showing Permission


may चा वाक्यातील उपयोग



“may” showing Permission

Permission (परमिशन) म्हणजे आज्ञा किंवा परवानगी हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

जेव्हा आपल्याला काही करण्यासाठी एखाद्याच्या परवानगीची आवश्यकता असते किंवा दुसऱ्या कोणाला काही करण्याची आज्ञा देण्याची आवश्यकता असते, तेव्हा may चा उपयोग केला जातो.

may चा इंग्रजी अर्थ to be permitted to (टू बी पर्मीटेड टू) म्हणजेच आज्ञा किंवा परवानगी असणे असादेखील करता येतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • तू जाऊ शकतोस / शकतेस.
  • You may go.
  • You are permitted to go.
  • तुला जाण्याची आज्ञा / परवानगी आहे.
Example 2
  • मी आत येऊ शकतो का?
  • May I come in?
  • Am I permitted to come in?
  • मला आता येण्याची आज्ञा / परवानगी आहे का?
Example 3
  • ते आज अधिक वेळ काम करू शकतात.
  • They may work overtime today.
  • They are permitted to work overtime today.
  • त्यांना आज अधिक वेळ काम करण्याची आज्ञा / परवानगी आहे.
Example 4
  • तिला फार गरज असेल तर ती उद्या सुट्टी घेऊ शकते.
  • She may take off tomorrow, if she needs it very badly.
  • She is permitted to off tomorrow, if she needs it very badly.
  • तिला फार गरज असेल तर तिला उद्या सुट्टी घेण्याची आज्ञा / परवानगी आहे.
Example 5
  • ते आता निघू शकतात.
  • They may leave now.
  • They are permitted to leave now.
  • त्यांना आता निघण्याची आज्ञा / परवानगी आहे.

This article has been first posted on and last updated on by