should


should चा वाक्यातील उपयोगModal Auxiliary Verb “should”

Duty (ड्युटी) म्हणजे कर्तव्य आणि Obligation (ऑब्लिगेशन) म्हणजे नैतिक बंधन यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी should चा उपयोग केला जातो.

जेव्हा एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून करावीशी वाटते किंवा दुसरे कुणीतरी ती नैतिक बंधन म्हणून करायला सांगते, तेव्हा should ची रचना वापरली जाते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • तू नेहमी खरे बोलावेस.
 • You should always speak the truth.
Example 2
 • विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा.
 • Students should study hard.
Example 3
 • तुम्ही तुमचा वेळ आळसात घालवू नये.
 • You should not waste your time in laziness.
Example 4
 • सर्व मुलामुलींनी चांगल्या प्रकृतीकरिता रोज व्यायाम करावा.
 • All the boys and girls should exercise everyday for good health.
Example 5
 • आपण आपल्या आईवडिलांची अवज्ञा करू नये.
 • We should not disobey our parents.
Example 6
 • तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवावे.
 • You should keep you house clean.

This article has been first posted on and last updated on by