should have


should have चा वाक्यातील उपयोगPast Modal Verb “should have”

कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट Duty (ड्युटी) म्हणजे कर्तव्य किंवा Obligation (ऑब्लिगेशन) म्हणजे नैतिक बंधन म्हणून करावयाची असते आणि ती तशी करण्याचे आपल्याकडून राहून जाते. परंतु, नंतर आपण ती गोष्ट करावयास हवी होती असे कदाचित आपल्याला पश्चात्ताप म्हणून वाटते.

जेव्हा अशी भावना आपल्याला व्यक्त करायची असते, तेव्हा should have (शुड हॅव्) चा उपयोग केला जातो.

should have ची रचना

should have च्या रचनेमध्ये should have ला जोडून नेहमी एखाद्या Past Participle चा उपयोग केला जातो.

should have च्या रचनेचे नकारार्थी स्वरूप  should not have असे करावे लागते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • आपण आपल्या मित्राला मदत करावयास हवी होती.
  • We should have helped our friend.

आपल्या मित्राला शक्य ती मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, मात्र ते आपण करू शकलो नाही आणि आता आपण त्याला मदत करावयास हवी होती असे आपल्याला पश्चात्ताप म्हणून वाटत आहे.

हा भाव दर्शविण्यासाठी या वाक्यामध्ये should have ची रचना वापरलेली आहे.

Example 2
  • लोकनेत्याने साधे जीवन जगायला हवे होते.
  • The leader of people should have lived a simple life.

लोकांच्या नेत्याने नेहमी साधे जीवन जगणे अपेक्षित आहे. ते त्यांचेे नैतिक कर्तव्यच आहे. मात्र त्यांनी ते केले नाही.

हा भाव दर्शविण्यासाठी या वाक्यामध्ये should have ची रचना वापरलेली आहे.

Example 3
  • मी माझ्या वडिलांचा अपमान करावयास नको होता.
  • I should not have insulted my father.

वडिलांचा आदर करणे हे प्रत्येक मुलाचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र, आदर न करता मुलाने वडिलांचा अपमान केला आणि आता आपण वडिलांचा असा अपमान करावयास नको होता, असे मुलाला पश्चात्ताप म्हणून वाटत आहे.

हा भाव दर्शविण्यासाठी या वाक्यामध्ये should not have ची रचना वापरलेली आहे.

Example 4
  • त्याने आपल्या आईला खोटे सांगावयास नको होते.
  • He should not have lied to his mother.

आईसोबत नेहमी खरे बोलणे हे मुलाला नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहे. मात्र, खरे बोलायचे सोडून मुलाने आईला खोटे सांगितले आणि आता आपण आईला असे खोटे सांगावयास नको होते, असे त्याला पश्चात्ताप म्हणून वाटत आहे.

हा भाव दर्शविण्यासाठी या वाक्यामध्ये should not have ची रचना वापरलेली आहे.

This article has been first posted on and last updated on by