to creep

इंग्रजी व्याकरणामध्ये creep (क्रीप्) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.

creep चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –

 • सरपटणे, रांगणे, हातापायावर जाणे
 • आवाज न करता नकळत जाणे
 • नकळत हळू हळू येणे (वेळ, वार्धक्य इत्यादी)
 • वाढून चढणे (वेली, रोपे इत्यादी)
 • अंगावर कीटक सरपटत आहेत असा भास होणे
creep ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
creep
(क्रीप्)
crept
(क्रेप्ट)
crept
(क्रेप्ट)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • Grapevine has crept over the wall.
 • द्राक्षांची वेल कुंपणावर वाढून चढली आहे.
Example 2
 • My skin creeps when I see a snake.
 • सापाला बघून माझ्या अंगावर काटा येतो. (अंगावर कीटक सरपटत आहेत असा भास होतो)
Example 3
 • He crept out of the room without being seen.
 • तो कोणालाही न दिसता आवाज न करता खोलीतून निघून गेला.
Example 4
 • Many mistakes have crept into her game.
 • तिच्या खेळामध्ये नकळतपणे अनेक चुका निर्माण झाल्या आहेत.
Example 5
 • Doubts creep in when you are not winning.
 • जेव्हा तुम्ही जिंकत नाही तेव्हा नकळतपणे मनामध्ये शंका निर्माण होतात.
Example 6
 • The inflation rate has been creeping up since last year.
 • गेल्या वर्षीपासून महागाईचा दर वाढत आहे.

This article has been first posted on and last updated on by