Types of Sentences


वाक्याचे प्रकार



Sentence म्हणजे काय?

शब्दांच्या अर्थपूर्ण रचनेला Sentence (सेन्टेन्स) म्हणजेच वाक्य असे म्हणतात.

वाक्यातील शब्दांची मांडणी सुसंगत प्रकारे केल्यास त्या वाक्यातून योग्य तो अर्थ बाहेर पडतो आणि शब्दांच्या अशा अर्थपूर्ण रचनेतून आपल्याला काय म्हणावयाचे आहे, हे दुसऱ्यालादेखील अगदी सहजपणे कळते.

इंग्रजी व्याकरणामध्ये वाक्याचे त्याच्या अर्थावरून आणि त्याच्या रचनेनुसार पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

इंग्रजी व्याकरणात अर्थावरून वाक्याचे एकूण चार प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

Assertive Sentence

Assertive Sentence (ऍसर्टिव्ह सेन्टेन्स) म्हणजे विधानार्थी वाक्य होय.

Assertive Sentence मध्ये केवळ एखादे विधान (statement) केलेले असते.

Interrogative Sentence

Interrogative Sentence (इंटरॉगेटिव्ह सेन्टेन्स) म्हणजे प्रश्नार्थी वाक्य होय.

Interrogative Sentence मध्ये एखादा प्रश्न (question) विचारलेला असतो.

Imperative Sentence

Imperative Sentence (इंपरेटिव्ह सेन्टेन्स) म्हणजे आज्ञार्थी वाक्य होय.

Imperative Sentence मध्ये एखादी आज्ञा (order) अथवा विनंती (request) केलेली असते.

Exclamatory Sentence

Exclamatory Sentence (एक्स्क्लॅमेटरी सेन्टेन्स) म्हणजे उद्गारार्थी वाक्य होय.

Exclamatory Sentence मध्ये एखादी उत्कट भावना (strong feeling) व्यक्त केलेली असते.

स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार

इंग्रजी व्याकरणात स्वरूपावरून वाक्याचे एकूण तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

Simple Sentence

Simple Sentence (सिम्पल सेन्टेन्स) म्हणजे साधे वाक्य होय.

Simple Sentence हा वाक्याचा मूळ प्रकार आहे. या वाक्यात एक Subject आणि एक Verb असते.

Compound Sentence

Compound Sentence (सिम्पल सेन्टेन्स) म्हणजे संयुक्त वाक्य होय.

Compound Sentence हे दोन किंवा अधिक Simple Sentences ना एखाद्या Conjunction ने एकत्र जोडून बनवलेले असते.

Complex Sentence

Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) म्हणजे मिश्र वाक्य होय.

Complex Sentence हे दोन किंवा अधिक वाक्यांना जोडून बनते. या वाक्यामध्ये मुख्यवाक्य आणि गौणवाक्य असे दोन भाग असतात.

This article has been first posted on and last updated on by