Adverb Phrase in English Grammar

Adverb Phrase (ऍड्व्हर्ब फ्रेज) म्हणजे अर्थपूर्ण क्रियाविशेषणवाचक शब्दसमूह किंवा क्रियाविशेषणवाचक वाक्यांश होय.

इंग्रजी वाक्यामध्ये Adverb म्हणून वापरल्या जाणाऱ्या Phrase ला Adverb Phrase असे म्हणतात.

नियम १

जेव्हा एखादे Adverb वाक्यात वापरले जाते, तेव्हा त्याचा उद्देश त्या वाक्यात वापरलेल्या Verb बद्दल अधिक माहिती सांगणे आणि त्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देणे हा असतो.

अशी माहिती देणारे Adverb हे एखाद्या Adverb Phrase च्या स्वरूपातसुद्धा असू शकते.

वाक्यातील Verb ने सूचित होणाऱ्या क्रियेची अधिक माहिती Adverb Phrase देते.

नियम २

Adverb Phrase हा दोनपेक्षा अधिक शब्दांचा समूह असतो आणि त्याची सुरूवात सामान्यतः एखाद्या Preposition ने केलेली असते.

नियम ३

Adverb Phrase ला कधीकधी वाक्याचे Extension (एक्सटेन्शन) म्हणजेच वाक्याचा विस्तार असेही म्हटले जाते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • बाबांनी वृक्षवाटीकेतून वेगवेगळ्या प्रकारची रोपटी आणली आहेत.
  • Father has brought different kinds of saplings from the nursery.

वरील वाक्यामध्ये to bring (आणणे) या verb विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी from the nursery या phrase चा उपयोग केलेला आहे.

तसेच, या phrase ची सुरूवात from या preposition ने केलेली आहे.

या वाक्यामध्ये from the nursery हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adverb चे काम करत असल्यामुळे त्याला Adverb Phrase असे म्हणतात.

Example 2
  • माकडे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतात.
  • Monkeys jump from one branch to another.

वरील वाक्यामध्ये to jump (उड्या मारणे) या verb विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी from one branch to another या phrase चा उपयोग केलेला आहे.

तसेच, या phrase ची सुरूवात from या preposition ने केलेली आहे.

या वाक्यामध्ये from one branch to another हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adverb चे काम करत असल्यामुळे त्याला Adverb Phrase असे म्हणतात.

Example 3
  • एक मुलगा रस्त्याच्या कडेने चालत होता.
  • A boy was walking along the road.

वरील वाक्यामध्ये to walk (चालणे) या verb विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी along the road या phrase चा उपयोग केलेला आहे.

तसेच, या phrase ची सुरूवात along या preposition ने केलेली आहे.

या वाक्यामध्ये along the road हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adverb चे काम करत असल्यामुळे त्याला Adverb Phrase असे म्हणतात.

Example 4
  • प्राचार्यांना मी उद्या तीन आणि चार च्या दरम्यान भेटेन.
  • I will meet the principal between three and four tomorrow.

वरील वाक्यामध्ये to meet (भेटणे) या verb विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी between three and four या phrase चा उपयोग केलेला आहे.

तसेच, या phrase ची सुरूवात between या preposition ने केलेली आहे.

या वाक्यामध्ये between three and four हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adverb चे काम करत असल्यामुळे त्याला Adverb Phrase असे म्हणतात.

Example 5
  • मुले घराच्या आत खेळत होती.
  • Children were playing inside the house.

वरील वाक्यामध्ये to play (खेळणे) या verb विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी inside the house या phrase चा उपयोग केलेला आहे.

तसेच, या phrase ची सुरूवात inside या preposition ने केलेली आहे.

या वाक्यामध्ये inside the house हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adverb चे काम करत असल्यामुळे त्याला Adverb Phrase असे म्हणतात.

This article has been first posted on and last updated on by