Adverb म्हणजे काय?

Adverb (ऍड्व्हर्ब) म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय.

Verb (क्रियापद) किंवा Adjective (विशेषण) किंवा Preposition (शब्दयोगी अव्यय) याच्या अर्थासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला Adverb असे म्हणतात.

नियम १

इंग्रजी व्याकरणामध्ये एखाद्या वाक्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी Adverb वापरले जाते.

For example (उदाहरणार्थ),
  • Unfortunately the accident could not be prevented.
  • दुर्दैवाने तो अपघात टळू शकला नाही.

वरील वाक्यामध्ये unfortunately  या Adverb मुळे संपूर्ण वाक्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे.

नियम २

सामान्यतः एखाद्या Noun (नाम) किंवा Pronoun (सर्वनाम) बद्दल अधिक माहिती देण्यासाठी Adverb चा उपयोग केला जात नाही. त्यासाठी एखाद्या Adjective (विशेषण) चा उपयोग केला जातो.

इंग्रजी व्याकरणातील Adverbs ची विभागणी पुढीलप्रमाणे एकूण आठ प्रकारांमध्ये केलेली आहे.

Adverb of Place

Adverb of Place (ऍड्व्हर्ब ऑफ प्लेस) म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.

वाक्यातील घडत असलेली क्रिया कुठे घडत आहे याचा उल्लेख करण्यासाठी Adverb of Place चा उपयोग केला जातो.

यामध्ये here, there, inside, outside, far, near इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Adverb of Place
Adverb of Time

Adverb of Time (ऍड्व्हर्ब ऑफ टाईम) म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.

वाक्यातील घडत असलेली क्रिया कधी घडत आहे याचा उल्लेख करण्यासाठी Adverb of Time चा उपयोग केला जातो.

यामध्ये now, then, today, tomorrow, yesterday इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Adverb of Time
Adverb of Number

Adverb of Number (ऍड्व्हर्ब ऑफ नंबर) म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय होय.

Adverb of Number हे वाक्यातील क्रिया किती वेळा घडते आहे, या प्रश्नाचे निश्चित उत्तर दर्शविण्यासाठी वापरले जाते.

यामध्ये once, twice, thrice इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Adverb of Number
Adverb of Frequency

Adverb of Frequency (ऍड्व्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी) म्हणजे पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय होय.

Adverb of Frequency हे वाक्यातील क्रिया किती वेळा घडते आहे, या प्रश्नाचे अनिश्चित उत्तर दर्शविण्यासाठी वापरले जाते.

यामध्ये always, sometimes, often, never इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Adverb of Frequency
Adverb of Manner

Adverb of Manner (ऍड्व्हर्ब ऑफ मॅनर) म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.

वाक्यातील घडत असलेली क्रिया कशा रीतीने घडत आहे याचा उल्लेख करण्यासाठी Adverb of Manner चा उपयोग केला जातो.

यामध्ये slowly, badly, fast, well, quickly इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Adverb of Manner
Adverb of Degree

Adverb of Degree (ऍड्व्हर्ब ऑफ डिग्री) म्हणजे परिमाणदर्शक क्रियाविशेषण अव्यय होय.

Adverb of Degree हे पूर्णत्वाची स्थिती अथवा परिमाण दर्शविण्यासाठी वापरले जाते.

यामध्ये very, nearly, at all, much, rather, somewhat इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Adverb of Degree
Interrogative Adverb

Interrogative Adverb (इंटरॉगेटिव्ह ऍड्व्हर्ब) म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय होय.

Interrogative Adverb चा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो.

यामध्ये where, when, how, why इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Interrogative Adverb
Relative Adverb

Relative Adverb (रिलेटिव्ह ऍड्व्हर्ब) म्हणजे संबंधी क्रियाविशेषण अव्यय होय.

Relative Adverb चा उपयोग दोन Sentences एकत्र जोडण्यासाठी केला जातो.

यामध्ये where, when, why इत्यादी क्रियाविशेषणांचा समावेश होतो.

Read more about Relative Adverb

This article has been first posted on and last updated on by